PIB Fact Check : आजकाल यूट्यूबपासून सोशल मीडियापर्यंत वेगवेगळ्या फोरमवर सरकारी योजनांची दिशाभूल करणारी माहिती बिनधास्तपणे पसरवली जात आहे. असाच एक व्हिडिओ सध्या यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये एक अजब दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांना 52 हजार रुपये रोख देत असल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय दावा?
सुनो दुनिया नावाचे एक यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. याच व्हिडिओमध्ये केंद्र सरकारच्या अंतर्गत ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजना’ सुरू असल्याचे म्हटले आहे. या योजनेत सर्व महिलांना 52 हजार रुपये दिले जात आहेत.
काय आहे व्हायरल व्हिडिओचे सत्य?
व्हायरल झालेला हा व्हिडिओ निराधार आणि खोटा आहे. पीबीआयने स्वतः त्याची सत्यता तपासली आहे आणि ते बनावट असल्याचे म्हटले आहे. पीआयबीने ट्विट केले आहे की केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ नावाने कोणतीही योजना चालवत नाही. त्यामुळे ही योजना आणि त्यात प्रत्येक महिलेला 52 हजार रुपये देण्याची चर्चा पूर्णपणे खोटी आहे.
'Suno Duniya' नामक #YouTube चैनल के एक वीडियो में यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी महिलाओं को 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' के तहत ₹ 52,000 की नकद धनराशि प्रदान कर रही है#PIBFactCheck
▶️ यह वीडियो #फर्जी है
▶️ केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं चलाई जा रही है pic.twitter.com/1wnGI9YLOt
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 29, 2023
हेही वाचा – Car Steering : भारतात कारचे स्टीयरिंग उजव्या बाजूला का असते? जाणून घ्या नेमके कारण!
खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती
हा व्हिडीओ खोटा आणि बनावट असल्याचे पीआयबीच्या फॅक्ट चेकमधून स्पष्ट झाले आहे. याद्वारे काही फसवणुकीचा प्रयत्न केला जात असल्याची शक्यता आहे. कारण काहीही असो, व्हिडिओ फसवणूक असल्याचे निश्चितच आहे. या व्हिडिओमध्ये ज्या सरकारी योजनेचा दावा केला जात आहे त्याबद्दल सरकारने कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. तसेच या योजनेशी संबंधित कोणतीही बातमी किंवा माहिती कोणत्याही वृत्तवाहिनी, वर्तमानपत्र किंवा संकेतस्थळावर आढळून आलेली नाही. हा व्हिडीओ कोणापर्यंत पोहोचतोय त्याचा गोंधळ होतोय हे उघड आहे, पण हा व्हिडीओ फेक असल्याने आम्ही सर्व वाचक आणि दर्शकांना आवाहन करतो की, असे तथ्यहीन व्हिडिओ फॉरवर्ड करू नका किंवा पाहू नका.