EVM वर २३ वर्षांची बंदी, बॅलेट पेपरने होणार मतदान..! वाचा काय खरं नी काय खोटं

WhatsApp Group

EVM Banned For 23 Years : ईव्हीएमद्वारे मतदान थांबवावे आणि बॅलेट पेपरने मतदान करावे, अशी मागणी देशातील विरोधी पक्षांकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. पण सध्या एका यूट्यूब चॅनलचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या स्क्रीन शॉटमध्ये ‘देशात ईव्हीएमद्वारे निवडणुका होणार नाहीत, बॅलेट पेपरद्वारे मतदान होणार’ असा दावा केला जात आहे. आधी हा मेसेज लोकांपर्यंत गेला, नंतर काही लोकांना धक्का बसला. पण पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) मधून मिळालेल्या माहितीनंतर लोकांना या दाव्याची वस्तुस्थिती कळली.

काय आहे व्हायरल मेसेजमध्ये?

यूट्यूब चॅनलचा स्क्रीन शॉट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये आता निवडणूक आयोग पुन्हा देशात बॅलेट पेपरने मतदान सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले. ईव्हीएमद्वारे मतदान बंद केले जात आहे. मात्र, या संदेशासोबत कोणतीही व्हिडिओ लिंक देण्यात आलेली नाही.

हेही वाचा – UPSC Interview Questions : अशी कोणती गोष्ट आहे जी उन्हात सुकत नाही? उत्तर एकमद सोप्पय!

नक्की खरे काय?

व्हायरल होत असलेल्या स्क्रीन शॉटची PIB फॅक्ट चेक केली असता वास्तव समोर आले. तथ्य तपासणीत असे आढळून आले की निवडणूक आयोगाने असा कोणताही बदल केलेला नाही. पुढील निवडणुका निश्चित नियमांच्या आधारेच होतील. या प्रकाराचा चुकीचा संदेश प्रसारित केला जात आहे.

केंद्राच्या अधिकृत तथ्य तपासक ‘पीआयबी फॅक्ट चेक’ने लोकांना दिशाभूल करणारे संदेश फॉरवर्ड करण्यास मनाई केली आहे. हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने वरील संदेशात सांगितले होते. सरकार आणि निवडणूक आयोगाकडून असे कोणतेही नियोजन नाही. पीआयबीकडून संबंधित ट्वीट १२ जानेवारीला करण्यात आले आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment