PIB Fact Check : बेरोजगार तरुणांना मोदी सरकारकडून ६००० रुपये? जाणून घ्या खरं काय!

WhatsApp Group

PIB Fact Check : केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून, त्यात महिलांपासून गरिबांपर्यंत सर्वाना आर्थिक सोयीसुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे. या सर्व योजनांमध्ये केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा ६००० रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचा दावा केला जात आहे. तुम्हालाही या भत्त्याचा लाभ घ्यायचा आहे का… तर जाणून घ्या सरकार खरोखरच हे पैसे देत आहे का?

नक्की खरं काय?

सध्या सोशल मीडियावर अनेक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सरकार बेरोजगारांना आर्थिक मदत करत असल्याचा दावा संदेशात केला जात आहे. हे पोस्ट पाहिल्यानंतर, पीआयबीने त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वस्तुस्थिती तपासली आहे.

PIBचे ट्वीट

एक व्हायरल व्हॉट्सअॅप संदेश असा दावा करत आहे की सरकार प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा ६००० रुपये भत्ता देत आहे.

हेही वाचा – Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का..! संसदेतील ‘या’ गोष्टीवर शिंदे गटाचा कब्जा

> हा मेसेज फेक आहे.
>> भारत सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही.
>> कृपया असे मेसेज फॉरवर्ड करू नका.

फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका

केंद्र सरकारने पुढे म्हटले आहे की, असे संदेश कोणाशीही शेअर करू नयेत. यासोबतच तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवरच संपर्क साधावा.

तुम्ही व्हायरल मेसेजची फॅक्ट चेक करू शकता

अशा फेक न्यूजपासून दूर राहा आणि या बातम्या कुणालाही शेअर करू नका, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. तूर्तास अशा बातम्या फॉरवर्ड करू नका. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक ९१८७९९७११२५९ किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment