PAN Card : पॅन कार्ड हे आजच्या काळात एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. या कार्डाशिवाय तुम्ही पैशाशी संबंधित कोणतेही काम करू शकत नाही. आयकर विभागाकडून जारी केला जाणारा हा एक महत्त्वाचा कागदपत्र आहे, परंतु सध्या पॅनकार्ड वापरणाऱ्या महिलांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत करण्यात आल्याची बातमी समोर येत आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत. एक पोस्ट समोर येत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार पॅनकार्ड असलेल्या सर्व महिलांना एक लाख रुपयाची रोख रक्कम देत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर पीआयबीला फॅक्ट चेकद्वारे त्याचे सत्य कळले आहे.
PIB चे ट्वीट
PIB ने आपल्या अधिकृत ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘Yojna 4u’ नावाच्या YouTube चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की केंद्र सरकार पॅन कार्ड असलेल्या सर्व महिलांना एक लाख रुपयांची रक्कम देत आहे.
हेही वाचा – Toll Tax : नितीन गडकरींची ‘मोठी’ घोषणा..! टोल टॅक्सच्या नियमात होणार बदल; हायवेवर…
दावा पूर्णपणे खोटा
वस्तुस्थिती तपासल्यानंतर हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आढळून आले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही. यासोबतच सरकारने म्हटले आहे की, अशा व्हायरल बातम्या कोणाशीही शेअर करू नका आणि फक्त सरकारी वेबसाइटवर विश्वास ठेवा.
तुम्ही व्हायरल मेसेज देखील तपासू शकता
तुम्हालाही असा काही मेसेज आला तर अजिबात काळजी करू नका. असे फेक मेसेज कोणाशीही शेअर करू नका. याशिवाय तुम्ही कोणत्याही बातमीची तथ्य तपासणी देखील करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!