Fact Check : येत्या २४ तासांत बंद होणार BSNL चे सिमकार्ड? वाचा काय खरं नी काय खोटं!

WhatsApp Group

Fact Check BSNL SIM : बीएसएनएलने आपल्या यूजर्ससाठी नवीन प्लान आणले आहेत. दरम्यान, एका नोटीसचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ट्राय (TRAI) ने ग्राहकाचे केवायसी (KYC) निलंबित केले आहे आणि सिम कार्ड गोठवले आहे. २४ तासांच्या आत बीएसएनएल कार्ड ब्लॉक केले जाई, असे लोकांना सांगण्यात आल्याची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे. जाणून घेऊया या व्हायरल पोस्टचे सत्य…

बीएसएनएलच्या सिमबाबत असा दावा केला जात आहे की, येत्या २४ तासांत युजर्सचे सिम बंद होतील. सोशल मीडियावर एक नोटीस मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बीएसएनएलचे सिम येत्या २४ तासांत बंद होतील असा दावा केला जात आहे. PIB ने व्हायरल पोस्टची सत्यता तपासली आहे आणि लोकांना त्याची वास्तविकता सांगितली आहे.

हेही वाचा  – हिवाळ्यात फिरायचंय? नागपूरसह ‘या’ ठिकाणांना द्या भेट; फॉरेनसारखं वाटेल!

खरंच बंद होणार बीएसएनएल?

PIB फॅक्ट चेकने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले की, “ट्रायने ग्राहकांचे केवायसी निलंबित केल्याचा दावा करणाऱ्या लोकांना बीएसएनएलकडून नोटीस मिळाल्या आहेत. २४ तासांच्या आत सिम कार्ड ब्लॉक केले जातील. हे दावे पूर्णपणे खोटे आहेत. बीएसएनएल कधीही अशी कोणतीही नोटीस पाठवत नाही.” आपल्या वापरकर्त्यांना सावध करत, PIB ने म्हटले आहे की तुमचे वैयक्तिक आणि बँक तपशील कधीही कोणाशीही शेअर करू नका.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. PIB ने हा दावा फेटाळून लावला आहे. सध्याच्या इंटरनेटच्या काळात लोकांची दिशाभूल करून त्यांच्यासोबत फसवणुकीची घटना घडत आहे.

यासोबतच चुकीची माहितीही मोठ्या प्रमाणात दिली जात आहे. अशा परिस्थितीत ‘वाचा मराठी’ने अशा कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. तुम्हाला कोणत्याही व्हायरल बातमीचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्ही या मोबाईल क्रमांक ९१८७९९७११२५९ किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment