Aadhaar Card Loan : सरकारकडून सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी लोकांना आधार कार्ड ठेवणे आणि बँक खात्यासह विविध खात्यांशी लिंक करणे बंधनकारक आहे. आधार कार्ड हे असे दस्तऐवज आहे, जे देशातील कोणत्याही नागरिकाला सरकारी सुविधांचा लाभ घेण्यास मदत करते. मात्र, सोशल मीडियावर आधार कार्डसंदर्भातील एक मेसेज व्हायरल होत आहे. केंद्र सरकार सर्व आधार कार्डधारकांना ४,७८,००० चे कर्ज देत असल्याचा दावा या संदेशात करण्यात आला आहे. तुम्हालाही असा काही मेसेज आला असेल तर आधी सावध व्हा. कारण असे मेसेज आल्यावर सरकारने इशारा दिला आहे.
व्हायरल मेसेजचे सत्य काय?
पीआयबी फॅक्ट चेक, सरकारच्या तथ्य तपासणी संस्थेने या दाव्याची चौकशी केली आणि हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आढळले. पीआयबी फॅक्ट चेकच्या वतीने अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केले गेले आणि असे सांगण्यात आले की सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे ज्यामध्ये दावा केला जात आहे की केंद्र सरकार सर्व आधार कार्ड धारकांना ४,७८,००० रुपये कर्ज देत आहे.
हेही वाचा – Mahindra Scorpio : मस्त डील..! फक्त ८ लाखात खरी आणा महिंद्रा स्कॉर्पिओ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
🚩जालसाजों से सावधान‼️
दावा : केंद्र सरकार सभी आधार कार्ड धारकों को ₹ 4,78,000 का लोन मुहैया करा रही है।#PIBFactCheck
✅ यह दावा #फ़र्ज़ी है।
✅ यह जालसाजी का एक प्रयत्न हो सकता है।
✅अपनी व्यक्तिगत/वित्तीय जानकारी किसी के साथ साझा न करें। pic.twitter.com/vRI32IFxap
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 15, 2023
पीआयबी फॅक्ट चेकने सांगितले की हा दावा पूर्णपणे खोटा आहे. ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे की, हा फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो आणि तुमची वैयक्तिक/आर्थिक माहिती कोणाशीही शेअर करू नका. सरकारने आपले वैयक्तिक तपशील शेअर करू नका असे आवाहन केले आहे.
PIB फॅक्ट चेक
PIB फॅक्ट चेक सोशल मीडियावर व्हायरल झालेले बनावट मेसेज किंवा पोस्ट समोर आणते आणि त्यांचे खंडन करते. हे सरकारी धोरणे आणि योजनांबद्दल चुकीच्या माहितीचे सत्य समोर आणते. तुम्हालाही कोणत्याही व्हायरल मेसेजचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही या मोबाईल क्रमांक ९१८७९९७११२५९ किंवा socialmedia@pib.gov.in वर मेल करू शकता.