PM नरेंद्र मोदींच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा कट? ईडीनं केला ‘मोठा’ खुलासा! वाचा…

WhatsApp Group

PFI Planned To Assassinate PM Modi : कट्टरपंथी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्यांच्या नेत्यांच्या तळांसह १०० हून अधिक लोकांना अटक केल्यानंतर, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (ED) एक मोठा दहशतवादी कट उघड केला आहे. पीएफआयने दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा ईडीने समोर आणला आहे. १२ जुलै रोजी पाटणा येथे मोदींच्या सभेला लक्ष्य करण्याचा संघटनेचा हेतू होता. यासाठी पीएफआयचे टेरर मॉड्यूल धोकादायक शस्त्रे आणि स्फोटके गोळा करण्यात गुंतले होते. याशिवाय पीएफआयने यूपीमधील संवेदनशील ठिकाणी बॉम्बस्फोट करून राज्यातील बड्या व्यक्तींवर हल्ला करण्याची योजना आखली होती.

जुलैमध्ये पाटणा येथून पीएफआय सदस्यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून जप्त केलेली कागदपत्रे, कट्टर इस्लामी संघटना नापाक योजना पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण शिबिरे चालवत असल्याची माहिती मिळाली. आता गुरुवारी, ईडीने राष्ट्रीय तपास संस्थेसह (एनआयए) देशातील १५ राज्यांमधील पीएफआयच्या तळांवर छापे टाकल्यानंतर गंभीर खुलासे केले आहेत. केरळमधून अटक करण्यात आलेल्या पीएफआय सदस्य शफिक पायथच्या रिमांड नोटमध्ये ईडीने दावा केला आहे की, या संघटनेने पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याच्या कटाचा एक भाग म्हणून प्रशिक्षण शिबिरे उभारली होती. याआधी २०१३ मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात मोदींच्या निवडणूक रॅलीदरम्यान इंडियन मुजाहिदीन आयएम या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला होता.

हेही वाचा – “सर, आम्ही वर्ल्डकप जिंकून येऊ”, जेव्हा धोनीचा आत्मविश्वास पाहून हादरले होते सिलेक्टर्स!

पीएफआयने गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवाया करण्यासाठी १२० कोटी रुपयांचा निधीही उभारल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. संस्थेला त्यातील बहुतांश रोख रक्कम मिळाली. २०२० च्या दिल्ली दंगली आणि उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जातीय सलोखा दुखावण्याच्या उद्देशाने हा निधी खर्च केल्याची बाबही तपासात समोर आली आहे. ईडीने पीएफआयवर दंगली भडकवण्यासाठी, दहशतवादी कट रचण्यासाठी आणि देशातील धोकादायक शस्त्रे-स्फोटकांची जमवाजमव करण्यासाठी निधी वापरल्याचा आरोप केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment