Petrol Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा कायम आहे. मोठ्या महानगरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशात मे 2022 मध्ये शेवटच्या वेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलण्यात आल्या होत्या. त्या काळात केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात आठ रुपयांनी तर डिझेलवर सहा रुपयांची कपात केली होती.
दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे पेट्रोल आणि डिझेलचे दर
नवी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
कच्च्या तेलात चढ-उतार सुरूच
कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 78.25 आहे आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 72.94 आहे. पूर्वी आर्थिक अस्थिरता आणि मागणी वाढण्याच्या शक्यतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती.
हेही वाचा – Rules Changing From 1 April : तुम्हाला माहितीये…1 एप्रिलपासून ‘या’ 6 गोष्टी बदलणार! वाचा
जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल सांगितले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्ही एसएमएसद्वारे तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला RSP डीलरला 92249 92249 वर एसएमएस करावा लागेल.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!