Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात क्रूड ऑइलच्या वाढत्या किमतींमुळे पुन्हा एकदा दबाव वाढू लागला आहे. गेल्या 24 तासात क्रूड ऑइल $2 पेक्षा महाग झाले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये बदल झाला असून आज पेट्रोल १०९ रुपयांच्या पुढे गेले आहे.
सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गाझियाबादमध्ये पेट्रोल 32 पैशांनी स्वस्त होऊन 96.26 रुपये प्रति लीटर झाले, तर डिझेल 30 पैशांनी घसरून 89.45 रुपये प्रति लीटर झाले. हरयाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल 4 पैशांनी महागले आहे आणि ते 96.97 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 4 पैशांनी वाढून 89.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल 68 पैशांनी महाग होऊन 109.46 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 62 पैशांनी वाढून 94.61 रुपये प्रति लीटरवर विकले जात आहे.
हेही वाचा – Indian Railways : तुम्हाला माहितीये…AC-3 आणि AC-3 इकॉनॉमीमधील फरक? जाणून घ्या!
कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर गेल्या 24 तासात त्याच्या किमतीत मोठी उसळी आली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत $2 पेक्षा जास्त वाढून प्रति बॅरल $77.93 वर पोहोचली आहे. जागतिक बाजारात डब्ल्यूटीआय दर देखील $3 ने वाढून $72.75 प्रति बॅरल झाला आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे.
- मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!