Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात शनिवारी कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे, त्यामुळे ब्रेंट क्रूड ०.९३ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल $८६.६६ वर स्थिरावले आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय १.६४ टक्क्यांनी कमी होऊन प्रति बॅरल $७९.६८ वर व्यापार करत आहे. दररोज सकाळप्रमाणे आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल केला आहे.
मध्य प्रदेशात आज पेट्रोल १० पैशांनी स्वस्त १०९.७० रुपये प्रति लिटर आहे. येथे डिझेल देखील १० पैशांनी स्वस्त झाले आहे आणि ते ९४.८९ रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. पंजाबमध्येही पेट्रोलचे दर ९ पैशांनी कमी झाले असून ते ९६.८७ रुपये प्रति लीटरवर उपलब्ध आहे, तर डिझेल ९ पैशांनी घसरून ८७.२२ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गुजरातमध्ये पेट्रोल ०.६३ पैशांनी स्वस्त झाले असून ते ९७.१२ रुपये प्रतिलिटर आहे
मिळत आहेत. मात्र, येथे डिझेलच्या दरात ७० पैशांनी वाढ झाली असून त्याची किंमत ९२.१७ रुपये प्रतिलिटर आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.
- मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे.
- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.
हेही वाचा – IRCTC Tour Package : स्वर्ग फिरण्याची संधी..! भारतीय रेल्वेकडून ‘मस्त’ पॅकेज; नाश्ता, जेवण FREE
या शहरांमध्येही नवीन दर
- नोएडामध्ये पेट्रोल ९६.६५ रुपये आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटर झाले आहे.
- गाझियाबादमध्ये ९६.५८ रुपये आणि डिझेल ८९.७५ रुपये प्रति लिटर आहे.
- लखनऊमध्ये पेट्रोल ९६.४४ रुपये आणि डिझेल ८९.६४ रुपये प्रति लिटर झाले आहे.
- पाटण्यात पेट्रोल १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर झाले आहे.
- चंदीगडमध्ये पेट्रोल ९६.२० रुपये आणि डिझेल ८४.२६ रुपये प्रति लिटर झाले आहे.
दररोज सकाळी ६ वाजता जाहीर केले जातात नवीन दर
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!