Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींबाबत आजही चांगली बातमी आहे. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमती जाहीर केल्या असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. अशाप्रकारे आज सलग २४३ वा दिवस आहे जेव्हा देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
देशातील महानगरांमधील पेट्रोल डिझेलचा दर
- दिल्ली (Delhi) : पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
- मुंबई (Mumbai) : पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
- कोलकाता (Kolkata): पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
- चेन्नई (Chennai): पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
तुमच्या शहरातीलआजचे दर जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलतात आणि सकाळी ६ वाजता अपडेट होतात. पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक शहर कोडसह RSP ९२२४९९२२४९ वर पाठवू शकतात आणि BPCL ग्राहक ९२२३११२२२२ वर RSP पाठवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPRICE ९२२२२०११२२ वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा – Indian Railways : सावधान..! ट्रेनमध्ये बदलण्यात आले ‘हे’ नियम; माहीत करून घ्या!
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी नरमाई दिसून येत आहे. या घसरणीनंतर, डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल $७९ आणि ब्रेंट क्रूड $८५ प्रति बॅरल जवळ पोहोचले आहे. जुलै २००८ नंतर या वर्षी मार्चमध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $१४० वर पोहोचल्या. यानंतरही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झालेली नाही.