Petrol Diesel Price Today : पेट्रोल, डिझेलच्या किमती बदलल्या? तपासा तुमच्या शहरातील नवीन दर!

WhatsApp Group

Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दिलासा आजही कायम आहे. तेल कंपन्यांनी बुधवारी (१९ एप्रिल २०२३) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती राष्ट्रीय स्तरावर मे २०२२ मध्ये शेवटचे बदलण्यात आल्या होत्या. त्यावेळी केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ८ रुपयांनी आणि डिझेलवरील ६ रुपयांनी कमी केले होते.

हेही वाचा – IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची पहिली आयपीएल विकेट आणि मुंबईचा विजय..! पाहा Video

प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल ९२.७६ रुपये दराने उपलब्ध आहे.
  • दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर विकले जात आहे.
  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल ९४.३३ रुपयांना उपलब्ध आहे.
  • कोलकात्यात एक लिटर पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

कच्च्या तेलाची किंमत

कच्चे तेल एका श्रेणीत व्यापार करत आहे आणि प्रति बॅरल $८५ च्या आसपास आहे. अलीकडेच, तेल उत्पादक देशांच्या समूह ओपेक प्लसने उत्पादनात कपात केल्याची घोषणा केल्यानंतर किमतीत मोठी उसळी आली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment