

Dog Bites Child in Lift : गाझियाबादच्या नंदग्राम पोलीस स्टेशन हद्दीतील राजनगर एक्स्टेंशनमध्ये असलेल्या चार्म्स काउंटी सोसायटीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या सोसायटीच्या लिफ्टमध्ये महिलेसोबत जाणाऱ्या कुत्र्यानं मुलाला चावा घेतला. आश्चर्य म्हणजे या घटनेनंतर त्या महिलेनं मुलाची साधी विचारपूसही केली नाही आणि त्या मुलाला एकदाही पाहण्याची तसदी घेतली नाही. कुत्र्यानं चावल्यानंतर ते मूल वेदनेनं ओरडत राहिले. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेचा असल्याचं सांगण्यात येत आहे.
गाझियाबादच्या राजनगर एक्स्टेंशनच्या चार्म्स सोसायटीच्या लिफ्टमध्ये सोमवारी एका महिलेच्या पाळीव कुत्र्यानं मुलाला चावल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कुत्रा चावल्यानंतरही महिला शांतपणे उभी राहिली. सध्या मुलाच्या वडिलांनी महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.
हेही वाचा की – डॉक्टरांशी बोलता बोलता पेशंटला आला हार्ट अटॅक; मग पुढं..! कोल्हापूरातील VIDEO व्हायरल
वेदनेनं रडत होतं मूल
मुलाच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांचा मुलगा हा इयत्ता चौथीचा विद्यार्थी आहे. सोमवारी संध्याकाळी तो क्लासवरून परतत असताना एक महिलाही तिच्या पाळीव कुत्र्यासह लिफ्टमध्ये आली. यादरम्यान महिला कुत्र्यासह लिफ्टमध्ये मागे होती आणि कुत्र्याच्या भीतीनं मूल पुढे गेलं. या दरम्यान कुत्र्यानं मुलाचा चावा घेतला. त्याचवेळी, व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मूल वेदनेनं ओरडत आहे आणि महिला उभी राहून पाहत आहे.
ग़ाज़ियाबाद…राजनगर एक्सटेंशन के चार्म्स काउंटी सोसायटी का हैरान कर देने वाला वीडियो…लिफ़्ट में महिला के साथ जा रहे कुत्ते ने बच्चे को काटा…बच्चा दर्द से कराहता…नहीं पसीजा महिला का दिल..थाना नादग्राम में एफआईआर दर्ज… @ghaziabadpolice
#Viral pic.twitter.com/KeQnQqVeo2— Prashant Singh (TV9 Bharatvarsh) (@prashant_rohan) September 6, 2022
या दरम्यान महिलेनं मुलाला सांभाळण्याचा प्रयत्नही केला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कुत्रा चावल्याची माहिती मुलाच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी आरोपी महिलेशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र तिनं योग्य प्रतिसाद न दिल्याने ते तिच्या फ्लॅटमध्ये गेले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना बोलावूनही ही महिला फ्लॅटमधून बाहेर आली नाही. सध्या पोलिसांनी मुलाला मेडिकलसाठी पाठवलं आहे.
हेही वाचा की – Asia Cup 2022 : इंडिया क्वालिफाय फॉर मुंबई एअरपोर्ट..! श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर मीम्सचा महापूर! पाहा…
यासंदर्भात नंदग्रामचे एसएचओ रमेश सिंह यांनी सांगितलं, की तक्रारीच्या आधारे तपास सुरू आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर सोसायटीत राहणारे लोक संतापले आहेत. भटक्या कुत्र्यांसह येथे पाळीव कुत्र्यांचीही दहशत वाढत असल्याचे सोसायटी सदस्यांनी सांगितलं. कुत्र्याला लिफ्टमध्ये नेण्यास बंदी घातली पाहिजे, असं ते म्हणाले.