VIDEO : रेशनच्या दुकानात मर्सिडीज गाडीवाला..! ४ गोणी टाकल्या डिक्कीत; इनक्रेडिबल इंडिया!

WhatsApp Group

Mercedes Man Took Free Subsidised Ration : भारतातील गरीब लोकांना परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्य पोहोचवण्यासाठी रेशन दिलं जातं. अलीकडेच सरकारनं संपूर्ण भारतात एक राष्ट्र एक रेशन कार्ड योजना देखील लागू केली आहे. पण ते नक्की किती गरीब लोकांपर्यंत पोहोचतं याचं जिवंत उदाहरण नुकतंच पंजाबमधून समोर आलं आहे. इथं एक व्यक्ती मर्सिडीज कारमधून रेशन घेण्यासाठी आली होती, ते पाहून तिथं उभ्या असलेल्या लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवला आणि आता तो खूप व्हायरल होत आहे.

नक्की प्रकरण काय?

व्हिडीओ पाहिल्यावर असं दिसून येतं की हा माणूस शिधावाटप दुकानाच्या बाहेर मर्सिडीज कारमधून गरिबांना सरकारनं दिलेला रेशन गोळा करण्यासाठी येतो. यानंतर डेपोधारकाकडून चार गोणी रेशन घेऊन गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून तो तेथून निघून जातो. अशा परिस्थितीत मर्सिडीजवाल्या व्यक्तीला रेशन कसं मिळतं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, त्या व्यक्तीकडं रेशन कार्ड असून शासनाच्या नियमानुसार कोणताही कार्डधारक रेशन घेण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचं शिधावाटप दुकानदाराचं म्हणणं आहे.

हेही वाचा की – Asia Cup 2022 : पाकिस्तानच्या विजयानंतर चाहत्यांनी खाल्ला मार..! अफगाण लोकांनी चोपलं; VIDEO व्हायरल!

व्हिडिओ का व्हायरल होतोय?

व्हिडिओ व्हायरल होण्याचं मुख्य कारण म्हणजे मर्सिडीजवाल्या त्या व्यक्तीनं रेशन घेतलं. मर्सिडीजच्या या मॉडेलची किंमत भारतात सुमारे ४४.९० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार Benz GLA मॉडेल आहे. त्याचवेळी त्या कारला व्हीआयपी नंबर प्लेट होती, त्यासाठी लाखो रुपये मोजावे लागले असण्याची शक्यता आहे. ही गाडी १९५० cc च्या जबरदस्त इंजिनसह येते आणि याला १८७.७४ bhp पॉवर मिळते. त्याचप्रमाणे, कार ट्रान्समिशनसाठी स्वयंचलित गिअरबॉक्ससह आहे.

हेही वाचा की – IPhone 14 आणि त्याच्या तीन भावांची घोषणा..! तिघांची किंमत महागडीच; तरीही वाचा!

मर्सिडीज गाडीवाला कोण?

जेव्हा मर्सिडीजमधून रेशन नेणाऱ्या गाडीवाल्याला विचारणा केल्यानंतर त्यानं सांगितलं, की ही गाडी त्याची नाही. ”ज्या व्यक्तीची मर्सिडीज गाडी आहे ती व्यक्ती भारताबाहेर राहते. ही गाडी आमच्याकडंच पार्क केली जाते. डिझेल कार असल्यानं काही दिवसांनी ही सुरू करणं गरजेचं आहे. मर्सिडीज गाडी विकत घेण्याएवढी आर्थिक परिस्थिती माझी नाही. मी गरीब असून माझी मुलं सरकारी शाळेत शिकतात”, असं मर्सिडीज चालवणाऱ्या रमेश सैनींनी सांगितलं आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment