काही क्षणात ‘ट्विन टॉवर’ पडताच लोकांनी आनंदानं वाजवल्या टाळ्या; VIDEO पाहिला का?

WhatsApp Group

Twin Towers Demolition : नोएडाचे ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त झाले आहेत. आजपासून अवघ्या काही मिनिटांपूर्वी ही इमारत स्फोटानं उडवली गेली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे दोन्ही टॉवर आज दुपारी अडीच वाजता उद्ध्वस्त करण्यात आले. मुंबईस्थित कंपनी एडफिस इंजिनिअरिंग आणि दक्षिण आफ्रिकेची भागीदार जेट डिमॉलिशन या कामात गुंतली होती. ३२ मजली ऍपेक्स (१०० मीटर) आणि २० मजली सायन (९७ मीटर) टॉवरमध्ये ३७०० किलो स्फोटकं ठेवून हा स्फोट दूरस्थपणे करण्यात आला. स्फोटावेळी खबरदारी म्हणून आजूबाजूचे रस्ते बंद करण्यात आले होते.

नोएडाचे सुपरटेक ट्विन टॉवर आज इतिहासजमा झाले. दुपारी अडीच वाजता ३७०० किलो स्फोटकांनी या दोन्ही इमारती १२ सेकंदात उद्ध्वस्त केल्या. इमारत उद्ध्वस्त झाली, तेव्हा तेथील लोकांनी टाळ्यांच्या गजरात या घटनेचं स्वागत केलं. घटनास्थळी डी कचरा उचलण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीम पोहोचली आहे. टीमला अपेक्षा आहे की एका तासात आजूबाजूच्या रस्त्याचा सर्व बांधकाम कचरा साफ केला जाईल. ट्विन टॉवरचा स्फोट होताच संपूर्ण बिल्डिंग डोळ्याच्या क्षणी खाली कोसळली. मात्र धुळीचं ढग सर्वत्र पसरले. सध्या धूळ कमी करण्याचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी आधीपासून तैनात असलेल्या स्मोक गनचा सहारा घेतला जात आहे. याशिवाय पाणी फवारणीही केली जात आहे.

हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : “थोडसं सिक्रेट राहू द्या यार”, पाकिस्तानी पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर रोहितचा षटकार; पाहा…

नक्की प्रकरण काय?

सुपरटेक बिल्डरला २३ डिसेंबर २००४ रोजी एमराल्ड कोर्टच्या नावावर सेक्टर ९३ ए मध्ये भूखंड देण्यात आला, ज्यामध्ये १४ टॉवर्सचा नकाशा पास करण्यात आला. यानंतर आराखड्यात तीन वेळा दुरुस्ती करून बिल्डरला दोन नवीन टॉवर उभारण्यास मान्यता देण्यात आली. हे दोन्ही टॉवर ग्रीन पार्क, चिल्ड्रन पार्क आणि दोन मजली कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या जमिनीवर बांधण्यात आले होते, ज्यांना आज ट्विन टॉवर म्हणून ओळखलं जातं. सुप्रीम कोर्टानं ३१ ऑगस्ट २०२१ रोजी ट्विन टॉवर्सच्या बांधकामात कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ते पाडून खरेदीदारांना १२ टक्के व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश दिले.

सुपरटेक ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्यासाठी, नियंत्रण कक्षाकडून अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्फोटासाठी बटण दाबले गेले. ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर छावणीत रूपांतरित झाला आहे. नोएडा सेक्टर ९३ मध्ये ८०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनानं यापूर्वीच संपूर्ण परिसरात अॅडव्हायझरी देऊन आजूबाजूची सोसायटी रिकामी केली होती. वाहतूक विभागानं यापूर्वीच अनेक रस्ते बंद केले होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment