तुम्ही पेटीएम (Paytm) वापरत असाल तर ही बातमी वाचणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण फिनटेक कंपनी पेटीएम 1 मार्चपासून आपल्या ॲपवर उपलब्ध असलेल्या अनेक सेवा बंद करत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकेवर कडक कारवाई केली आहे. त्यानंतर, 29 फेब्रुवारीपासून कंपनी पेटीएम पेमेंट्स बँक ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही.
याशिवाय 29 फेब्रुवारीनंतर सध्याच्या ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करणे थांबवण्याचे आदेशही आरबीआयने कंपनीला दिले आहेत. नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
आरबीआयने म्हटले आहे, की 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम ग्राहक खाते, प्रीपेड उपकरणे, वॉलेट, फास्टॅग आणि नॅशनल मोबिलिटी कार्डमध्ये पैसे जमा करू शकणार नाहीत. नवीन ठेवी आणि नवीन टॉपअप बनवण्यावरही बंदी आहे. 1 मार्चपासून पेटीएम पेमेंट्स बँकेकडून कोणतीही बँकिंग सेवा दिली जाणार नाही.
हेही वाचा – FASTag KYC Update : सरकारने केवायसी अपडेट करण्याची मुदत वाढवली
मात्र, 29 फेब्रुवारीनंतरही युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वर बंदी नाही. याशिवाय ग्राहकांच्या पैसे काढण्यावर कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही. ग्राहक त्यांच्या वॉलेट, फास्टॅग, कार्डमधील पैसे वापरू शकतील. पण हा प्लॅटफॉर्म आणि त्याच्या ग्राहकांना, विशेषत: व्यवसाय मालकांना मोठा धक्का आहे कारण देशभरात याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!