Paytm कंपनीने 1000 हून अधिक लोकांना कामावरून का काढलं?

WhatsApp Group

नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच 1000 हून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. एकीकडे लोक नवीन वर्षाच्या तयारीत व्यस्त आहेत. दुसरीकडे, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. दिग्गज फिनटेक कंपनी पेटीएमने आता 1000 हून अधिक लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कंपनीने अनेक युनिट्स एकत्र करून ही नवीन कपात (Paytm Lays Off Reason In Marathi) केली आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, कंपनीतील एका व्यक्तीने सांगितले की, ही कपात प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू होती. सध्या AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मुळे ही छाटणी करण्यात आली आहे. पेटीएमच्या या निर्णयानंतर सुमारे 10 टक्के लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतील.

हेही वाचा – YouTube कडून अजून कमाईची संधी, नवीन फीचर लाँच, कंटेंट क्रिएटर्सची चांदी!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पेटीएम स्टाफचा खर्च 10 ते 15 टक्क्यांनी कमी करण्याचा विचार करत आहे. या कपातीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. सध्या कंपनीचे लक्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर देण्यात आले आहे.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कपातमध्ये त्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, जे काम AI च्या मदतीने करता येते. पेटीएमने असेही म्हटले आहे की हे पाऊल खर्चात कपात करण्यासाठी आणि व्यवसाय सुधारण्यासाठी उचलण्यात आले आहे. असे आणखी निर्णय घेतले जाऊ शकतात, असे संकेत कंपनीकडून देण्यात आले आहेत.

कंपनीचे पुढील लक्ष

सध्या पेटीएम कंपनीचे लक्ष संपत्ती व्यवस्थापन आणि विमा क्षेत्रावर आहे. फिनटेक क्षेत्रानंतर कंपनीला या व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. सध्या कंपनीत येणाऱ्या काळात नवीन नोकऱ्याही निर्माण होऊ शकतात. ज्या नव्या नोकर्‍या होतील त्याही याच क्षेत्रात अपेक्षित आहेत.

पहिल्या 3 तिमाहीत मोठ्या प्रमाणात कपात

अहवालानुसार, पेटीएमने पहिल्या तीन तिमाहीत 28,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. पेटीएमच्या या टाळेबंदीमुळे अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत. त्याचबरोबर कर्ज विभागातील लोकांच्या नोकऱ्यांवरही परिणाम होऊ शकतो, असा विचार आता लोक करत आहेत. अलीकडे कर्जाचे नियम बदलले असून त्याचा परिणाम कंपनीवर दिसून येत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment