कमाल झाली राव..! मेंदूच्या ऑपरेशनदरम्यान पेशंट वाजवत होता सॅक्सोफोन; पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

Patient Pllaying Saxophone During Brain Surgery : शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात गेलेल्या एका संगीतकाराने आश्चर्यकारक काम केले. वास्तविक, मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान तो सॅक्सोफोन वाजवत होता. तेही ९ तासांसाठी. ३५ वर्षीय रुग्णावर शस्त्रक्रिया होत असताना त्याने अनेक वेळा सॅक्सोफोन वाजवला. ही घटना इटलीत घडली. सीझेड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णावर रोममधील पीडिया इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन यशस्वी झाले आणि त्याला नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

रूग्णाचा ट्यूमर यशस्वीरित्या काढण्यात आल्याचे हॉस्पिटलचे सर्जन आणि ज्येष्ठ डॉ. ख्रिश्चन ब्रोग्ना यांनी सीबीसी न्यूजला सांगितले. रुग्णावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. ब्रेन ट्यूमरवर १० तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केली. ही गाठ मेंदूच्या अत्यंत गुंतागुंतीच्या भागात होती.

हेही वाचा – डॉक्टरने महिलेच्या डोळ्यातून काढल्या २३ कॉन्टॅक्ट लेन्स..! पाहा Viral Video

डॉ. ब्रोग्ना म्हणाले की सुमारे ९ तास चाललेल्या ऑपरेशन दरम्यान रुग्णाने अनेक वेळा सॅक्सोफोन वाजवला. त्याने १९७० मध्ये आलेल्या ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटाचे थीम साँग आणि इटालियन राष्ट्रगीत वाजवले. रुग्णाने वैद्यकीय पथकाला सांगितले होते की त्याच्यासाठी संगीत क्षमता राखणे महत्वाचे आहे. शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाने सॅक्सोफोन वाजवल्याने डॉक्टरांना मेंदूच्या विविध कार्यांचे मॅप काढता आले.

शस्त्रक्रियेदरम्यान वाद्य वाजवल्यामुळे रुग्णाचे ब्रेन मॅपिंग करणे सोपे झाले. डॉक्टरांनी सांगितले की उपशामक औषधांशिवाय शस्त्रक्रिया अत्यंत अचूकतेसह न्यूरोनल नेटवर्क्स मॅप करणे शक्य करते. ऑपरेशनपूर्वी सहा ते सात वेळा वैद्यकीय पथकाने रुग्णाची तपासणी केली.

Leave a comment