Odisha Train Accident : अपघातात बचावलेल्या ‘त्या’ प्रवाशाने सांगितली घटना! म्हणाला….

WhatsApp Group

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. हावडा-बंगळुरू ट्रेनचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेसला दुसऱ्या ट्रॅकवर धडकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर कोरोमंडल ट्रेनचे डबेही रुळावरून घसरले आणि तेथून जाणाऱ्या मालगाडीला धडकले. अपघातानंतरची वेदनादायक चित्रे घटनास्थळावरून समोर आली आहेत. काही प्रवाशांनी त्यांनी पाहिलेले दृश्य कथन केले.

या दुर्घटनेतून बचावलेल्या एका प्रवाशाने सांगितले, ”आरक्षित श्रेणी असूनही डब्यात गर्दी होती. ट्रेन उलटली, मी त्यावेळी झोपलो होतो. अचानक एक धक्का बसला, मी डोळे उघडले तेव्हा किमान 15 जण माझ्या अंगावर पडले. कसा तरी जीव वाचवून मी बाहेर आलो, तेव्हा मी पाहिले की कोणाचे हात नाही, कोणाचे पाय नाही. कोणाचा तरी चेहरा विद्रूप झाला होता. मला अनेक ठिकाणी दुखापत झाली, पण देवाचे आभार मानून माझा जीव वाचला.” त्याचवेळी आणखी एका प्रवाशाने सांगितले, ”आम्हाला वाटले की आता आम्ही सुटू शकणार नाही. कसेबसे काही प्रवाशांनी बोगीच्या खिडक्या तोडल्या, मग आम्ही बाहेर पडलो.”

हेही वाचा – Odisha Train Accident : फोटोसाठी कायपण? रेल्वेमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन काय केले? पाहा Video

वर्णनाच्या पलीकडे दृश्य

रुपम बॅनर्जी या प्रवाशाने पत्रकारांना सांगितले की, अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचून प्रवाशांना मदत करण्यास सुरुवात केली. त्यांनी मदत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. लोकांनी केवळ बोगीतून बाहेरच काढले नाही तर त्यांचे सामान शोधून पीडितांना पाणी आणले. दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, बोगी आणि डब्यांच्या टॉयलेटमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. घटनास्थळावरील काही दृश्ये वर्णन करण्यापलीकडे आहेत.

गोवा-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द

दुसरीकडे, ओडिशा रेल्वे अपघातानंतर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे कामकाज रद्द करण्यात आले. ओडिशात तीन गाड्या रुळावरून घसरल्याने मडगाव स्थानकावर गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याचे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी व्हिडिओ लिंकद्वारे गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते, तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या समारंभासाठी मडगाव स्थानकावर उपस्थित राहणार होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment