13 डिसेंबर 2001 : संसदेवर दहशतवादी हल्ला कसा झाला?

WhatsApp Group

13 डिसेंबर 2001 रोजी सकाळी भारतीय संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू होते. काही वेळातच देशातील सर्वात सुरक्षित जागेवर इतका मोठा हल्ला होईल, असे कोणालाही वाटले नव्हते. हा हल्ला (Parliament Attack 2001 In Marathi) लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांनी केला होता. 5 दहशतवाद्यांनी 14 जणांचा जीव घेतला होता. यात 08 सुरक्षा कर्मचारी आणि 1 माळी देखील शहीद झाला.

काय घडलं?

संसदेच्या परिसरात अचानक गोळ्यांचे आवाज येऊ लागले. एके-47 असलेल्या पांढऱ्या Ambassador कारमधून दहशतवादी संसदेच्या संकुलात घुसले. या गाडीचा नंबर DL-3CJ-1527 असा होता. सुरुवातीला सुरक्षा कर्मचार्‍यांना ते दहशतवादी वाटत नव्हते, पण नंतर संकुलातील त्यांच्या हालचालीवरून हे स्पष्ट झाले की, लष्कराचा गणवेश परिधान करून संसदेच्या संकुलात घुसलेले हे लोक चुकीच्या हेतूने आले होते. या गाडीवर लाल दिवा आणि गृह मंत्रालयाचा स्टिकर होता. संसदेच्या संकुलात प्रवेश केल्यानंतर दहशतवाद्यांची गाडी इमारतीच्या गेट क्रमांक 12 कडे जात असताना एका सुरक्षा कर्मचाऱ्याला संशय आला. त्याने गाडी पाठी फिरवायला सांगितली. तोपर्यंत ही गाडी तत्कालीन उपराष्ट्रपती कृष्णकांत यांच्या गाडीला धडकली होती. यानंतर एके-47 ने सशस्त्र दहशतवादी कारमधून खाली उतरले आणि गोळीबार सुरू केला.

गोळीबार सुरू होताच संसदेचा अलार्म वाजला. मुख्य इमारतीचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. संसदेत उपस्थित सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरले. यानंतर सुमारे अर्धा तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. सर्व दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात 5 दिल्ली पोलीस कर्मचारी, CRPF ची एक महिला कॉन्स्टेबल, संसद वॉच आणि वॉर्ड सेक्शनचे दोन सुरक्षा सहाय्यक, एक माळी आणि एक फोटो पत्रकार यांचा मृत्यू झाला.

फोटो – सोशल मीडिया

हेही वाचा – पोलिसाने नोकरी सोडून केली पांढऱ्या चंदनाची शेती, कमी खर्चात करोडोंचे उत्पन्न!

अडवाणी यांच्यासह 200 खासदार उपस्थित

हल्ल्याच्या वेळी संसदेत अनेक खासदार आणि मंत्री उपस्थित होते. हल्ल्यावेळी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सुमारे 200 खासदार संसदेच्या संकुलात उपस्थित होते. हल्ला होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना एका खोलीत पाठवून सुखरूप ठेवले.

हल्ल्यानंतर काय झाले?

संसदेवर ज्या दिवशी हल्ला झाला, त्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला. काही दिवसांतच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चार जणांना अटक केली. दहशतवाद्यांनी वापरलेल्या कारमध्ये सापडलेल्या लिंकच्या आधारे या चौघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी जेकेएलएफचा दहशतवादी मोहम्मद अफजल गुरू, त्याचा चुलत भाऊ शौकत हुसेन गुरू, शौकतची पत्नी अफसान गुरू आणि डीयू अरबी व्याख्याता एसएआर गिलानी यांना अटक केली. गिलानी, शौकत आणि अफजल यांना फाशीची शिक्षा देत न्यायालयाने अफसानची सुटका केली. 2003 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने गिलानी यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. 2005 मध्ये सुप्रीम कोर्टाने शौकतला 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती, तर 2013 मध्ये अफझल गुरूला फाशीची शिक्षा सुनावली गेली.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment