Pallavi Joshi Accident : ‘द काश्मीर फाइल्स’ अभिनेत्री आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीची पत्नी पल्लवी जोशींच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पल्लवी जोशींचा अपघात झाला आहे. पल्लवी जोशीला त्यांना आगामी ‘व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाच्या सेटवर दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगदरम्यान एका वाहनाचा तोल गेला आणि पल्लवी जोशींना धडक दिली.
पल्लवी जोशींचा पुढील चित्रपट ‘व्हॅक्सिन वॉर’चा क्रू सध्या हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यानच ती त्यांचा अपघात झाला. मात्र, त्यांना गंभीर दुखापत झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अशा परिस्थितीत त्यांनी आधी त्यांचे शूट पूर्ण केले आणि सीन पूर्ण केल्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले आणि दुखापती गंभीर नसल्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले.
हेही वाचा – LIC Recruitment : एलआयसीमध्ये मिळेल नोकरी..! ३०० जागांसाठी भरती; ‘असा’ भरा आपला फॉर्म!
Actress #PallaviJoshi injured on sets of '#TheVaccineWar' in Hyderabad
Read: https://t.co/wtLUaK6Oey pic.twitter.com/pQOQhP57VJ
— IANS (@ians_india) January 17, 2023
विवेक अग्निहोत्रींची पोस्ट व्हायरल
पल्लवी जोशींसोबत घडलेल्या या घटनेनंतर पती आणि द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, ”आयुष्य म्हणजे अतिवेगाने धावण्याचा खेळ, अवजड वाहतूक, मद्यधुंद वाहनचालकांसाठी अपघात प्रवण रस्ता. स्वतःला वाचवावे लागेल. बहुतेक लोक अपघातांना बळी पडतात आणि त्यातून कधीच सावरत नाहीत. जे अपघातातून वाचतात, पुन्हा उठतात आणि धावतात, त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतात.”