पाकिस्तानच्या लाहोरमध्ये जगातील सर्वात विषारी हवा, आठवडाभर सर्वांना वर्क फ्रॉम होम, भारताला दोष

WhatsApp Group

Lahore Pollution : पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर लाहोरमधील रहिवासी अत्यंत विषारी हवेत श्वास घेत आहेत. शनिवारी, लाहोरचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 1900 वर पोहोचला आणि सरकारी अधिकाऱ्यांना धक्का बसला. वायू प्रदूषणाच्या अशा धोकादायक स्थितीत लाहोरमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रविवारी विविध प्रदूषण संस्थांच्या जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत लाहोर अव्वल स्थानावर राहिले. पंजाब प्रांताच्या पर्यावरण मंत्री मरियम औरंगजेब यांनी भारताला दोष देत सोमवारी नवी दिल्लीकडे हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले.

लाहोरमधील विषारी हवेच्या पार्श्वभूमीवर आठवडाभर घरून काम करणे अनिवार्य करण्यात आले आहे. रविवारी संपूर्ण शहरातील पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा 9 नोव्हेंबरपर्यंत (शनिवार) बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. मुलांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परिस्थिती सुधारली नाही तर निर्बंध आणखी वाढवले ​​जातील.

हेही वाचा – काही तासांत 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान! शेअर बाजार धडाम, काय घडलं?

औरंगजेब म्हणाले, की परिस्थिती फार वाईट आहे. त्यांनी वीटभट्टी मालक आणि वाहतूकदारांना परिस्थिती आणखी बिघडू नये, असा इशारा दिला. ते म्हणाले की सरकार लॉकडाऊन लागू करण्यासह कठोर पावले उचलू शकते. दोन अतिरिक्त ‘ग्रीन लॉकडाऊन’साठीही तयारी सुरू आहे.

रविवारी पत्रकार परिषदेत पंजाबच्या वरिष्ठ मंत्री मरियम औरंगजेब यांनी ‘भारतातून येणारे धुके’ असा इशारा दिला. ते म्हणाले की, किमान आठवडाभर लाहोरच्या दिशेने वारे वाहत राहतील. मंत्र्यांनी दावा केला की अमृतसर आणि चंदीगड येथून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे लाहोरमधील AQI गेल्या दोन दिवसांपासून 1,000 पेक्षा जास्त आहे.

वाऱ्याची दिशा बदलता येणार नाही आणि सीमेपलीकडील धुक्याचा प्रश्न चर्चेनेच सोडवला जाऊ शकतो, असे औरंगजेब म्हणाले.

वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment