अनेक पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले आणि काही प्रमाणात ते यशस्वीही झाले. पाकिस्तानी कलाकारांना भारतात खूप पसंती दिली जात होती. असाच एक पाकिस्तानी अभिनेता, ज्याचा जन्म कराची शहरात झाला, पण त्याची क्रेझ भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये जबरदस्त पसरली. अभिनेता फवाद खानने (Fawad Khan) आपल्या टॅलेंटच्या जोरावर फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले.
फवादचे भारतात लाखो चाहते आहेत. फवादचे वडील आणि आई दोघेही भारताचे. त्यांच्या वडिलांचा जन्म पंजाबमध्ये झाला, तर आई उत्तर प्रदेशची होती. फाळणीनंतर त्यांचे आई-वडील पाकिस्तानात स्थायिक झाले. पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीला ‘द लीजेंड ऑफ मौला जट’ हा पहिला 100 कोटींचा चित्रपट देणार्या फवादला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्याची स्वतःची लव्ह लाईफ देखील कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा वेगळी नाही.
पाकिस्तानमध्ये जन्माला येऊनही त्याने बॉलिवूडमधून करिअरची सुरुवात केली. त्याने 2014 मध्ये ‘खूबसूरत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनम कपूरही होती. प्रेमासाठी फवादने अभिनयाला नारळ दिला होता. लाहोरच्या ग्रामर स्कूलमध्ये शिकत असताना आयुष्यात पहिल्यांदाच फवाद प्रेमात पडला, त्यावेळी तो फक्त 17 वर्षांचा होता.
फवादची शाळेतच सदफ खानशी मैत्री झाली. फवाद हळुहळू सदफच्या प्रेमात पडला, पण त्याच्या लाजाळू स्वभावामुळे सदफला त्याने याबाबत काही सांगितले नाही. पहिल्या भेटीनंतर अवघ्या सात दिवसांनी फवादने सदफसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यानंतर दोघांनीही कॉलेजपर्यंतचा प्रवास एकत्र घालवला.
हेही वाचा – पैशाची चणचण आहे, अकाऊंट रिकामी झालंय, तरीही मिळतील 10 हजार रुपये!
हळूहळू दोघांमधील प्रेम वाढत गेले, पण सदफचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. आपल्या मुलीने टीव्ही अभिनेत्याशी लग्न करावे असे सदफच्या कुटुंबीयांना वाटत नव्हते. सदफच्या कुटुंबीयांनी फवादसमोर अट ठेवली की, त्याने अभिनय क्षेत्र सोडले, तरच सदफ लग्न करेल.
यानंतर फवादने काहीही विचार न करता आपले करियर पणाला लावले. अभिनय सोडल्यानंतर तो 8 तासाची नोकरी करू लागला. यानंतर दोघांनी 2005 मध्ये लग्न केले. आज फवाद खान हे अभिनय जगतात एक प्रसिद्ध नाव आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!