Chandrayaan-3 : भारत चंद्रावर पोहोचला आहे, चंद्रावर चांद्रयान यशस्वी लँडिंग झाल्यानंतर संपूर्ण देशातील लोकांमध्ये उत्साह दिसून आला. इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अनेक अभिनंदनाचा वर्षाव झाला, तर भारताच्या शेजारी देश पाकिस्तानमध्ये इस्रोच्या या यशाची जोरदार चर्चा सुरू आहे. चांद्रयानच्या यशाचा उल्लेख करताना पाकिस्तानातील सामान्य नागरिकांसोबतच न्यूज अँकरही आपल्याच देशावर टीका करत आहेत.
पाकिस्तानी अँकरचा व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानी अँकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणतेय की भारत चंद्रावर पोहोचला आहे पण आम्हीही मागे नाही. आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्याला शत्रूपुढे झुकू दिलेले नाही. भारत चंद्रावर पोहोचला तर काय झाले, आपण आधीच आकाशात आहोत. आपल्या देशात महागाई, वीजबिल, गॅसचे दर, पेट्रोल, डिझेल, रॉकेलचे दर गगनाला भिडले आहेत.
हेही वाचा – Viral Video : बेडवर फोन चार्जिंगला लावून ठेवला, थोड्याच वेळात झाली भयानक अवस्था!
पाकिस्तानातील महागाईचा संदर्भ देत अँकरने म्हटले आहे की, आम्ही आधीच आकाशात आहोत, त्यामुळेच पाकिस्तानी लोक म्हणत आहेत की, भारत चंद्रावर पोहोचला तर आम्ही स्वर्गात जाऊ. या पाकिस्तानी महिला अँकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर लोक मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
भारताचा रेकॉर्ड
चांद्रयान-3 चे विक्रम लँडर बुधवारी (23 ऑगस्ट) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. यासह चंद्राच्या या भागात पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. याआधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यात कोणताही देश यशस्वी होऊ शकला नव्हता. चांद्रयानाच्या यशस्वी लँडिंगनंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. मात्र, यापैकी एकाही देशाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचता आलेले नाही. भारताला तिसऱ्यांदाच यश मिळाले आहे. यापूर्वी भारताने 2019 मध्ये चांद्रयान-2 लाँच केले होते. महत्त्वाचे म्हणजे चंद्रावर जाण्यासाठी भारताचे पहिले मिशन चांद्रयान-1 होते, पण ते केवळ एक ऑर्बिटर होते, अंतराळयान नव्हते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!