Pakistan Beggar : पाकिस्तानमध्ये एका भिकाऱ्याच्या खिशात 5 लाखांहून अधिक रुपये सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वयोवृद्ध भिकारी बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता आणि बचावकार्यात रुग्णालयात नेत असताना त्याच्या खिशात पैसे सापडले.
पाकिस्तानच्या वृत्तवाहिनी जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब प्रांतातील सरगोधा जिल्ह्यातील खुशाब रोडवर भिकारी बेशुद्ध पडलेला होता. वृद्धाला रुग्णालयात नेणाऱ्या बचाव पथकाने सांगितले की, त्याच्याकडून 5 लाख 34 हजार पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या भिकाऱ्याकडून एक पासपोर्टही सापडला असून त्यात तो अनेकवेळा सौदी अरेबियाला गेल्याचे दिसून आले आहे. हा वृद्ध सौदी अरेबियात जाऊन भीक मागायचा, असा अंदाज वर्तवला जात आहे. स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एक अज्ञात कॉल आला ज्यानंतर बचाव पथक वृद्ध व्यक्तीच्या मदतीसाठी पोहोचले. ती व्यक्ती त्याच परिसरात भीक मागते, असे तेथे राहणाऱ्या लोकांनी टीमला सांगितले.’ बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की वृद्धाला रुग्णालयात नेण्यात आले आणि जेव्हा तो बरा झाला, तेव्हा त्याचे सर्व पैसे आणि सामान घरी जाताना त्याला परत करण्यात आले.
हेही वाचा – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची कमाल! ‘या’ गोष्टींसाठी होतोय AI चा वापर
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पाकिस्तानी नागरिक उमराह व्हिसावर सौदी अरेबियात जाऊन भीक मागत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. ओव्हरसीज पाकिस्तानी आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाने परदेशी पाकिस्तानींच्या सिनेट समितीला सांगितले की, मोठ्या संख्येने भिकारी मानवी तस्करीच्या माध्यमातून परदेशात जात आहेत. मंत्रालयाने सिनेट समितीला सांगितले की परदेशात अटक करण्यात आलेले 90% भिकारी पाकिस्तानी आहेत.
इराक आणि सौदी अरेबियाच्या राजदूतांनी सांगितले की अशा अटकेमुळे त्यांच्या तुरुंगात गर्दी वाढली आहे. सौदी अरेबियातील मस्जिद अल हरमच्या बाहेर पकडण्यात आलेले बहुतांश पाकिटमार पाकिस्तानी वंशाचे आहेत. हे लोक भीक मागण्यासाठी उमराह व्हिसावर सौदीला पोहोचतात.
व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!