मॉल बनवण्यासाठी पाकिस्तानातील 150 वर्ष जुनं हिंदू मंदिर पाडलं!

WhatsApp Group

Hindu Temple Demolished In Karachi : पाकिस्तानमधील कराचीमध्ये 150 वर्षे जुने हिंदू मंदिर पाडण्यात आले आहे. सिंध प्रांताच्या सरकारने हे मंदिर जुनी आणि धोकादायक वास्तू घोषित करून पाडली. या घटनेमुळे हिंदू समाज हादरला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा कराचीच्या सोल्जर बझारमध्ये असलेले मारी माता मंदिर बुलडोझरच्या सहाय्याने पोलिसांच्या उपस्थितीत पाडण्यात आले. परिसरातील जुन्या हिंदू मंदिरांचे काळजीवाहू रामनाथ मिश्रा महाराज यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “सकाळी अधिकाऱ्यांनी ते पाडले आणि आम्हाला त्याबद्दल कोणतीही पूर्व माहिती नव्हती.”

श्री पंचमुखी हनुमान मंदिर मरी माता मंदिराजवळ आहे. मिश्रा यांनी सांगितले की, बुलडोझरने मंदिराच्या बाहेरील भिंती आणि मुख्य गेट अबाधित ठेवले, तर आतील संपूर्ण वास्तू पाडण्यात आली. मिश्रा म्हणाले की, मंदिर सुमारे 150 वर्षांपूर्वी बांधले गेले. त्यांच्या अंगणाखाली खजिना दडला असल्याचा दावा त्यांनी केला. हे मंदिर सुमारे 400 ते 500 स्क्वेअर यार्ड परिसरात पसरले होते. अनेक वर्षांपासून जमीन बळकावणारे आणि विकासकांचे हे लक्ष्य आहे.

लहान खोलीत ठेवलेल्या देवतांच्या मूर्ती

स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, मंदिर पाडण्यात आले आहे. ते म्हणाले की, मंदिर परिसराला अधिकाऱ्यांनी धोकादायक म्हणून घोषित केले आहे. मंदिराची देखभाल कराचीच्या मद्रासी हिंदू समुदायाने केली होती, ज्यांनी हे मान्य केले की ही रचना खूप जुनी आणि धोकादायक होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. मंदिर व्यवस्थापनाची इच्छा नसतानाही बहुतांश देवतांच्या मूर्ती एका छोट्या खोलीत तात्पुरत्या ठेवाव्या लागल्या. तिथे नवीन काही बांधले नाही तर ते असेच राहणार.

हेही वाचा – WI Vs IND 1st Test : शॉट फसला, यशस्वी जयस्वालची डबल सेंच्युरी हुकली! पाहा Video

मंदिराची जमीन विकासकाला विकल्याचा आरोप

रमेश हे या भागातील हिंदू समाजाचे नेते आहेत. बनावट कागदपत्रांवर ही जमीन विकसकाला विकण्यात आल्याने मंदिर व्यवस्थापनावर काही काळ जागा रिकामी करण्याचा दबाव असल्याचे त्यांनी सांगितले. या भूखंडावर त्याला व्यावसायिक इमारत बांधायची आहे. रिपोर्टनुसार येथे एक मॉल बनवला जाणार आहे. हिंदू समुदायाने पाकिस्तान-हिंदू परिषद, सिंधचे मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह आणि पोलिस महानिरीक्षकांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. कराचीमध्ये अनेक प्राचीन हिंदू मंदिरे असल्याची माहिती आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू हा सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे. इथली बहुतेक हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे जिथे ते मुस्लिमांसोबत संस्कृती, परंपरा आणि भाषा शेअर करतात.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment