थायलंडला मिळाली सर्वात ‘युवा’ पंतप्रधान, नाव पायतोंगटार्न शिनावात्रा

WhatsApp Group

Thailand New Young PM : थायलंडला पायतोंगटार्न शिनावात्रा (Paetongtarn Shinawatra)यांच्या रूपाने नवा पंतप्रधान मिळाला आहे. माजी पंतप्रधान आणि अब्जाधीश ताक्सिन चिनावत यांची 37 वर्षीय मुलगी पायतोंगटार्न देशाचे नेतृत्व करणारी सर्वात तरुण पंतप्रधान ठरली आहे. थायलंडच्या खासदारांच्या मंजुरीनंतर शुक्रवारी पायतोंगटार्न यांची नियुक्ती करण्यात आली. याच्या दोन दिवसांपूर्वी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नैतिक मूल्यांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून श्रेथा थविसिन यांना पदावरून हटवले होते.

पायतोंगटार्न चिनावत हे थायलंडच्या सर्वात प्रभावशाली राजकीय कुटुंबातून येतात. त्यांचे वडील ताक्सिन चिनावत यांना एकेकाळी राजकारणात पराभूत करणे फार कठीण मानले जात होते. ताक्सिन चिनावत 2001 मध्ये थायलंडमध्ये सत्तेवर आले आणि देशाच्या उत्तर आणि उत्तर-पूर्व भागातील ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय झाले. मात्र त्यांच्या सत्तेच्या कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप झाले आणि देशाचे लष्कर त्यांना नापसंत करू लागले. 2006 मध्ये सत्तापालट करून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. असे असूनही थायलंडच्या राजकारणात त्यांचा प्रभाव अजूनही कायम आहे.

हेही वाचा – National Film Awards 2024 : ‘कांतारा’चा ऋषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता; ए. आर. रहमान, अरिजित यांना राष्ट्रीय पुरस्कार

ताक्सिन चिनावत यांच्या तीन मुलांपैकी पायतोंगटार्न या सर्वात लहान आहे. तसेच, देशाचे नेतृत्व करणारी ती कुटुंबातील चौथी सदस्य आहे. ताक्सिन चिनावत यांचे मेहुणे सोमचाई वोंगसावत हे 2008 मध्ये थोड्या कालावधीसाठी पंतप्रधान होते, तर त्यांची बहीण यिंगलक चिनावत 2011 ते 2014 पर्यंत थायलंडच्या पंतप्रधान होत्या. न्यायालयाच्या निर्णयामुळे दोघांनाही पदावरून हटवण्यात आले.

यिंगलक यांच्यानंतर थायलंडचे नेतृत्व करणाऱ्या पायतोंगटार्न या दुसऱ्या महिला आहेत. पंतप्रधान होण्यासाठी त्यांना 493 खासदारांपैकी 247 खासदारांची मंजुरी आवश्यक होती, ती त्यांना मिळाली.

राजकारणाचा अनुभव नाही

पायतोंगटार्न यांना राजकीय अनुभव नाही आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात त्यांनी पदभार स्वीकारला आहे, जे त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. पायतोंगटार्न या फेउ थाई पक्षातून आले आहेत, जे गेल्या वर्षीच्या निवडणुकीत मूव्ह फॉरवर्ड पार्टीनंतर दुसऱ्या क्रमांकावर होते. मुव्ह फॉरवर्ड पक्ष लोकशाही सुधारणांचे आश्वासन देऊन निवडणुकीत उतरला होता. मूव्ह फॉरवर्ड सत्तेवर आल्याचे पाहिल्यानंतर, पायतोंगटार्न यांच्या वडिलांनी कायदेशीर खटले टाळण्यासाठी लष्करातील त्यांच्या पूर्वीच्या शत्रूंसोबत एक वादग्रस्त करार केला. 15 वर्षांच्या वनवासानंतर गेल्या वर्षी ते देशात परतले आणि मुव्ह फॉरवर्डला विरोधी पक्षात बसण्यास भाग पाडले.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment