Rajasthan News : राजस्थानमधील कोटा येथील एका 70 वर्षीय वृद्धाला पोटदुखीची तक्रार होती. त्यांनी उपचारासाठी हॉस्पिटल गाठले. तेथे त्यांच्या पित्ताशयात दगड असल्याचे आढळून आले, तेही मोठ्या प्रमाणात. डॉक्टरांनी तातडीने वृद्धावर शस्त्रक्रिया केली. पण जेव्हा त्यांनी दगड काढायला सुरुवात केली, तेव्हा खुद्द डॉक्टरही चक्रावून गेले. रुग्णाचे ऑपरेशन अर्धा तास चालले. डॉक्टरांनी वृद्धाच्या पोटातील 6110 खडे काढले.
आता ऑपरेशननंतर वृद्ध व्यक्ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुंदी जिल्ह्यातील एक 70 वर्षीय शेतकरी काही दिवसांपासून पोटदुखीची तक्रार करत होता. पोटात जड झाल्याची तक्रार घेऊन तो डॉक्टरांकडे गेला. वृद्धाची सोनोग्राफी केली असता पित्ताशयात पूर्णपणे दगड भरल्याचे समोर आले. पित्ताशयाचा आकार सामान्यतः 7 बाय 2 सेमी असतो, जो दुप्पट (12 बाय 4 सेमी) पर्यंत वाढला होता.
हेही वाचा – New PPF Rules 2024 : पीपीएफ योजनेत तीन नवे नियम; 1 ऑक्टोबरपासून बदल!
शुक्रवारी 5 सप्टेंबर रोजी 70 वर्षीय व्यक्तीचे ऑपरेशन करण्यात आले. त्यानंतर एक दिवसानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यशस्वी ऑपरेशननंतर वृद्ध व्यक्ती आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे. पोटातील खडे बाहेर काढल्यानंतर ते मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना अडीच तासांपेक्षा जास्त वेळ लागला. पित्ताशयात अनेक खडे येण्याची घटना अनुवांशिक कारणांमुळे देखील असू शकते. फास्ट फूड, फॅटी फूड किंवा झपाट्याने वजन कमी होणे यासारख्या खाण्याच्या सवयीही यामागे कारणीभूत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डॉक्टर म्हणाले, रुग्णाच्या पित्ताशयातील खडे काढले नसते तर भविष्यात रुग्णाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले असते. स्वादुपिंडात सूज, कावीळ, कॅन्सर असाही संशय होता. पित्ताशयाला एंडोबॅगमध्ये ठेवून हे खडे काढण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!