Viral Video : संसदेत मारामारी..! गरोदर महिला खासदाराच्या वाजवली कानाखाली; मग तिनंही…

WhatsApp Group

Viral Video : कोणत्याही देशाच्या संसदेत अनेकदा नेते एकमेकांशी वाद घालताना दिसतात. पण सभागृहात एकमेकांना कानाखाली मारणे किंवा लाथ मारणे हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आफ्रिकन देश सेनेगलमधून समोर आला आहे, जिथे एका खासदाराने संसदेत सत्ताधारी महिला खासदाराला मारहाण केली. संतप्त झालेल्या महिला खासदाराने नेत्यावर खुर्चीही भिरकावली. दोन्ही नेत्यांमधील भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महासभेत हा गदारोळ झाला तेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. दरम्यान, सत्ताधारी पक्षाचे खासदार अमी नादिये गनीबी आणि विरोधी खासदार मसाता सांब यांच्यात जोरदार वादावादी झाली. वाद इतका वाढला की मस्साता आपल्या जागेवरून उठले आणि महिला खासदाराला मारायला लागले.

कानाखाली मारल्यानंतर महिला खासदारही संतप्त झाल्या आणि त्यांनी विरोधी पक्षाच्या खासदारावर खुर्ची फेकली. दरम्यान, संसदेत उपस्थित असलेल्या मोठ्या संख्येने लोकांनी मध्यस्थी करत दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – Indian Railways : करोडो प्रवाशांसाठी गिफ्ट..! आता विना तिकीट करा प्रवास, टीसीही थांबवणार नाही!

सेनेगल संसदेत गदारोळ का झाला?

गदारोळ होण्यापूर्वी सेनेगलच्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. यादरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या महिला खासदार बेनो बोक याकर यांनी एका आध्यात्मिक नेत्यावर टीका केली. अध्यात्मिक नेत्यावर सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने अध्यक्ष मॅकी सॅल यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला विरोध केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

एका महिला खासदाराला झालेल्या मारहाणीविरोधात सत्तेतील लोक मोठ्या संख्येने आंदोलन करत आहेत. विरोधी पक्षनेत्याच्या या हल्ल्याचा पक्षश्रेष्ठींनी निषेध केला आहे. कानाखाली मारणाऱ्या खासदाराच्या विरोधात सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये महिला खासदार गरोदर असून मारहाणीमुळे तिच्या मुलालाही बाधा झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment