Bike Taxi News : सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील बाइक टॅक्सी चालवणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती देताना या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी हायकोर्टाने पॉलिसी येईपर्यंत बाइक टॅक्सी चालवण्याचे आदेश दिले होते. परंतु, सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते पुन्हा बंद करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात खटल्यादरम्यान, Uber च्या वकिलाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की 2019 पासून भारतातील अनेक राज्यांमध्ये दुचाकींचा वापर बाइक टॅक्सी सेवा म्हणून केला जात आहे. मोटार वाहन कायद्यांतर्गत यावर कोणतेही निर्बंध नसल्याचे त्यांनी सुनावणीच्या खंडपीठाला सांगितले. त्यांनी आपल्या युक्तिवादात सांगितले की, केंद्राने दुचाकीसाठी अधिसूचना जारी केली आहे, त्यानुसार ती व्यावसायिक वापरासाठी वापरली जाऊ शकते.
Setback to cab aggregators#SC #biketaxi #nobiketaxi #delhi #ola #rapido #uber #setbackforcab #twowheelertaxis #bakitaxibanned #latestnews #PTCnews pic.twitter.com/s56DKqks00
— ਪੀਟੀਸੀ ਨਿਊਜ਼ | PTC News (@ptcnews) June 12, 2023
हेही वाचा – WTC Final 2023 : भारतीय संघाला जबर शिक्षा, शुबमन गिलसह सर्वांचे पैसे कापले!
वकिलांच्या या युक्तिवादांवर न्यायालयाने बाइक टॅक्सी चालवताना कोणत्याही प्रकारचा अपघात झाला तर त्यासाठी विमा काढला जातो का, अशी विचारणा केली. यावर Uber कडून असे सांगण्यात आले की Uber थर्ड पार्टी इन्शुरन्स देते. दिल्लीत 35 हजारांहून अधिक ड्राईव्ह असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याचे ते म्हणाले. बाइक चालवणारे लोक तसेच ती वापरणारे लोक.
सुनावणीदरम्यान Uberच्या वकिलाने सांगितले की, गेल्या 4 वर्षांपासून दिल्ली सरकारचे कोणतेही धोरण समोर आलेले नाही. यावर ते म्हणाले की, जोपर्यंत याबाबत धोरण तयार होत नाही तोपर्यंत बाइक टॅक्सी चालवू द्याव्यात. मात्र, सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की, सध्यातरी राष्ट्रीय राजधानीत बाइक टॅक्सीवरील बंदी कायम राहील.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!