ओलाचा धमाका…! चक्क 5 इलेक्ट्रिक स्कूटर केल्या लाँच; वाचा!

WhatsApp Group

Ola Electric Scooter : स्वातंत्र्यदिनाला ओला स्कूटर्सने पाच इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. Ola ने S1X इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे, तिचे तीन व्हेरिएंटही सादर केले आहेत. ज्यामध्ये S1X , S1X 2 किलोवॅट आणि S1X प्लस यांचा समावेश आहे. Ola ने OLA S1X हे त्याचे सर्वात परवडणारे मॉडेल म्हणून लॉन्च केले आहे, ज्याची सुरुवातीची किंमत फक्त रुपये 89,999 (एक्स-शोरूम) आहे.

15 ऑगस्ट 2023 रोजी, ओला इलेक्ट्रिकने हे व्हेरिएंट एकत्रितपणे बाजारात लाँच केले आहेत. Ola S1X इलेक्ट्रिक स्कूटर ही स्कूटर पोर्टफोलिओमध्ये सर्वात स्वस्त आहे.

ओला इलेक्ट्रिक बाईक – ओला इलेक्ट्रिकने क्रूझर, अॅडव्हेंचर आणि रोडस्टर प्रकारांमध्ये ई-बाईकचे अनावरण केले आहे.

ओला इलेक्ट्रिकने डायमंड हेड नावाच्या सुपरबाईकचेही अनावरण केले आहे. याबाबत अजून फारसा खुलासा झालेला नाही.

हेही वाचा – Horoscope Today : ‘या’ ६ राशींसाठी सूर्याचे संक्रमण खूप फायदेशीर, जाणून घ्या कसा जाईल तुमचा आजचा दिवस

MoveOS 4 सॉफ्टवेअर- ओला इलेक्ट्रिकचे हे नवीन सॉफ्टवेअर स्कूटरमधील तंत्रज्ञान आणि फीचर्स वाढवेल. स्कूटरची रेंजही वाढेल.

Ola S1 मालिकेतील इलेक्ट्रिक स्कूटरची दुसरे जनरेशन लॉन्च करण्यात आले आहे. मागील जनरेशनचे मॉडेल देखील विक्रीसाठी उपलब्ध असेल.

नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Ola ने लॉन्च केली आहे ज्याची एक्स-शोरूम किंमत 89999 लाख रुपये आहे. या स्कूटरच्या इतर प्रकारांची एक्स-शोरूम किंमत 99999 लाख रुपये आणि 109999 लाख रुपये आहे. 21 ऑगस्टपर्यंत या स्कूटर्स प्रास्ताविक किमतीत खरेदी करता येतील. या बाइक्स कंपनीने फक्त सादर केल्या आहेत.

दुसरीकडे, S1X चे 2 KW प्रकार 90 किमीची श्रेणी आणि 85 किमी प्रतितास ची सर्वोच्च गती देते आणि 3 KW प्रकार 151 किमीची श्रेणी आणि 90 किमी प्रतितास ची सर्वोच्च गती प्रदान करते. S1  मध्ये LED लाइट्स, फ्लॅट फूटबोर्ड, फ्लॅट टाईप सीट, पाच इंच TFT टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखे अनेक फीचर्स कंपनीने दिले आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment