Electric Scooter : Ola कडून ‘भगव्या’ रंगाची इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च..! सिंगल चार्जमध्ये ‘इतकी’ किमी धावणार

WhatsApp Group

Ola Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. एका वर्षातच ओला इलेक्ट्रिक देशातील नंबर वन इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी बनली. २०२२ मध्ये, कंपनीने १ लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली. कंपनीकडे सध्या Ola S1, Ola S1 Pro आणि Ola S1 Air सारख्या स्कूटर्स पोर्टफोलिओमध्ये आहेत. ओला इलेक्ट्रिकने त्यांच्या S1 आणि S1 Pro स्कूटरचे गेरूआ व्हर्जन लॉन्च केले आहे. याशिवाय कंपनीने S1 साठी सहा नवीन रंग सादर केले आहेत. या नवीन अपडेटसह, Ola S1 आणि S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटर आता एकूण १२ रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

रंग प्रकार

Ola S1 आणि S1 Pro आता एकूण १२ रंग प्रकारांमध्ये उपलब्ध असतील.

  • मॅट ब्लॅक
  • कोरल ग्लॅम
  • मिलेनियल पिंक
  • पोर्सिलेन व्हाइट
  • मिडनाईट ब्लू
  • निओ मिंट
  • लिक्विड सिल्व्हर
  • जेट ब्लॅक
  • मार्शमॅलो
  • अँथ्रेसाइट ग्रे
  • लिक्विड सिल्व्हर
  • गेरुआ एडिशन

हेही वाचा – मोदी सरकारची ‘मोठी’ घोषणा..! ‘या’ लोकांना सहज मिळणार ५००० रुपये; जाणून घ्या!

Ola Electric Scooter launches Gerua edition for S1 and S1 Pro know details

स्पेसिफिकेशन आणि किंमत

Ola S1 मध्ये ३ kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे तर S1 Pro मध्ये ४ kWh चा एक मोठा पॅक आहे. कंपनीचा दावा आहे की Ola S1 ची रेंज पूर्ण चार्ज केल्यावर १४१ किमी आहे. आणि Ola S1 Pro १८१ किमीची रेंज देते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Ola S1 ची किंमत ९९,९९९ रुपये आहे तर S1 Pro ची किंमत १.४० लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे

नवीन रंगांच्या घोषणेवर, ओला इलेक्ट्रिकचे सीएमओ अंशुल खंडेलवाल म्हणाले, “ओलाने आपल्या ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक वाहने सुलभ आणि परवडणारी बनवून यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. आम्ही गेऊआ व्हर्जन आणले आहे.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

 

Leave a comment