Electric Scooter : भारतात आली नवी इलेक्ट्रिक स्कूटर..! जाणून घ्या किंमत, फीचर्स, आणि टॉप स्पीड

WhatsApp Group

Electric Scooter : देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादक कंपनी ओकायाने आज त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Okaya Faast F2F देशांतर्गत बाजारात लॉन्च करण्याची घोषणा केली. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर खास शहरी राइड आणि दैनंदिन वापरासाठी तयार करण्यात आली आहे. आकर्षक लुक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकने सजलेल्या या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरुवातीची किंमत ८३,९९९ रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

Okaya Faast F2F स्कूटरबद्दल

ओकायाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये, कंपनीने ८००W-BLDC-हब मोटर वापरली आहे जी ६०V३६Ah (२.२ kWh) लिथियम आयन – LFP बॅटरीसह जोडलेली आहे. कंपनीचा दावा आहे की तिची बॅटरी उच्च सुरक्षा मानकांचे पालन करते आणि बॅटरीवर २ वर्षांची वॉरंटी दिली जात आहे. फास्ट F2F लाँच करून ओकायाचे उद्दिष्ट विद्यार्थी, तरुण व्यावसायिक इत्यादींना उद्देशून इलेक्ट्रिक स्कूटर्सची स्वस्त श्रेणी प्रदान करणे आहे.

हेही वाचा – 8th Pay Commission : होळीपूर्वी मोठी बातमी..! पगार ४४% वाढणार; वाचा डिटेल्स

याशिवाय Okaya Faast F2F टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक रिअर शॉक अॅब्जॉर्बर सस्पेन्शन देण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि स्टायलिश डीआरएल हेड-लॅम्प आणि एजी टेल-लॅम्प यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. ही स्कूटी ६ रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये मेटॅलिक ब्लॅक, मेटॅलिक सायन, मॅट ग्रीन, मेटॅलिक ग्रे, मेटॅलिक सिल्व्हर आणि मेटॅलिक व्हाइट यांचा समावेश आहे.

Okaya Faast F2F ची प्रमुख वैशिष्ट्ये

उच्च-क्षमता LFP बॅटरी : कंपनीचा दावा आहे की ही बॅटरी दीर्घ आयुष्य आणि उच्च तापमानातही चांगली कामगिरी करते. याशिवाय बॅटरीवर २ वर्षे/२०,००० किलोमीटरची वॉरंटीही दिली जात आहे.

उत्तम ड्रायव्हिंग अनुभव : कंपनीचे म्हणणे आहे की ही स्कूटर कमाल ५५ किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहे. त्यामुळे, ही इलेक्ट्रिक-स्कूटर शहरातील राइड्ससाठी अधिक योग्य आहे जिथे बहुतेक वेळा जास्त रहदारी असते. एवढेच नाही तर यात १०-इंचाचे ट्यूबलेस टायर्स, टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक शॉक ऍब्जॉर्बर्स देखील मिळतात, जे खडबडीत आणि खराब रस्त्यावरही आरामदायी राइड देतात.

बॅटरी चार्जिंग : कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ऑन-द-गो जनरेशनसाठी ६०V क्षमतेची ३६Ah (2.2 kWh) Lithium Ion-LFP बॅटरी वापरली आहे. जे ८००W क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरला जोडलेले आहे. बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त ४-५ तास लागतात आणि त्यात तीन ड्रायव्हिंग मोड आहेत: इको, सिटी आणि स्पोर्ट्स.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment