Odisha Train Accident : भयानक अपघात आणि मृत्यूचं तांडव! ज्युनियर NTR म्हणाला, “प्रत्येक माणसासोबत….”

WhatsApp Group

Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे 900 जण जखमी झाले आहेत. हा अपघात भारतातील स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात प्राणघातक रेल्वे अपघातांपैकी एक आहे. लष्कर आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्यात गुंतले आहेत. बोगीत अडकलेल्या लोकांचा शोधही सुरू आहे. या अपघातानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. दाक्षिणात्य अभिनेका ज्युनियर NTR नेही ट्वीट करून या घटनेची दखल घेतली आहे.

ज्युनियर NTR ट्वीट करत म्हणाला, ”या भीषण रेल्वे दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या प्रियजनांप्रती मनःपूर्वक संवेदना. या विनाशकारी घटनेतील प्रत्येक माणसासोबत माझे विचार आहेत. या कठीण काळात त्यांना बळ आणि आधार मिळो.”

हेही वाचा – Odisha Train Accident : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 12 लाख, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाची घोषणा

कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. दरम्यान, यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस (दुरांतो) तेथे आली आणि कोरोमंडलला धडकली आणि उलटली. या धडकेनंतर कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला धडकली, ज्यामध्ये रेल्वेचे इंजिन बोगीवर चढले.

या भीषण अपघातानंतर टीएमसीने शेजारच्या राज्यातील या रेल्वे अपघाताबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शनिवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment