Odisha Train Accident : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार 12 लाख, पंतप्रधान आणि रेल्वे मंत्रालयाची घोषणा

WhatsApp Group

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या आणि जखमींच्या नातेवाईकांसाठी मदतीची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरून दुसर्‍या ट्रेनला धडकल्याने आतापर्यंत एकूण 280 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.

या अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले की, “ओडिशातील रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 50,000 रुपये दिले जातील.”

हेही वाचा – Odisha Train Accident : अपघातात बचावलेल्या ‘त्या’ प्रवाशाने सांगितली घटना! म्हणाला….

दुसरीकडे, पंतप्रधान सहायता कोष व्यतिरिक्त, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि गंभीर जखमी आणि गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली आहे. जखमींना 50-50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही एक निवेदन जारी केले आहे की, शनिवारी राज्यात शोक दिवस असेल आणि या दिवशी कोणताही राज्य कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. दुसरीकडे, या अपघाताबाबत बोलताना कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ओडिशातील वेदनादायक अपघात लक्षात घेता गोवा-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींचा हिरवा झेंडा दाखवण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment