अरेरे…! तब्बल 12 वर्षानंतर केन विल्यमसन कसोटीत रनआऊट, पाहा VIDEO

WhatsApp Group

Kane Williamson | न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेत (NZ vs AUS) चुरशीची स्पर्धा सुरू आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा दिग्गज खेळाडू केन विल्यमसनवर खिळल्या होत्या. मात्र दुर्दैवाने तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. क्रिकेटच्या खेळात धावबाद हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा चुकीचा फटका खेळल्यानंतर फलंदाज बाद होतो, पण धावबाद झाल्यानंतर फलंदाज खूपच निराश झालेला दिसतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटीत अनुभवी खेळाडू केन विल्यमसनसोबत असेच काहीसे घडले. या सामन्यात सर्वजण विल्यमसनच्या योगदानाची वाट पाहत होते, मात्र दुर्दैवाने खाते न उघडताच धावबाद झाल्याने त्याची विकेट गेली.

कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा फलंदाज धावबाद झालेले दिसतात. पण 2012 पासून विल्यमसनचे नशीब त्याच्यावर मेहरबान असल्याचे दिसले. 2012 नंतर विल्यमसनची कसोटी क्रिकेटमध्ये धावबाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विल्यमसनने त्याच्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा धावबाद होऊन विकेट गमावली आहे. पण विल्यमसन कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच शून्यावर धावबाद झाला आहे. विल्यमसनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिचेल स्टार्कच्या चेंडूवर केन विल्यमसन मिड-ऑफमधून धावा चोरण्यासाठी धावला पण दुसऱ्या टोकाला उभ्या असलेल्या विल यंगसोबत त्याची टक्कर झाली आणि लाबुशेनच्या थेट थ्रोमुळे विल्यमसनची विकेट गमावली.

हेही वाचा – आजपासून LPG सिलिंडर महागला, मार्चच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना झटका!

न्यूझीलंड संघाने कसोटीला शानदार सुरुवात केली होती. पण अष्टपैलू कॅमेरून ग्रीन न्यूझीलंडसमोर भिंत ठरला. ग्रीनने 174 धावांची शानदार खेळी साकारली आणि संघाची धावसंख्या 383 धावांपर्यंत नेली. काउंटर ॲक्शनमध्ये किवी संघाची अवस्था कमकुवत दिसत होती. केन विल्यमसन धावबाद झाल्यानंतर गोंधळ झाला. युवा फलंदाज रचिन रवींद्रलाही खाते उघडण्यात अपयश आले. पहिल्या 4 फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. मात्र, टॉप बंडर (33), ग्लेन फिलिप्स (71) आणि मॅट हेन्री (42) यांच्या खेळीमुळे संघाला 179 धावांपर्यंत मजल मारता आली. आता ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment