NTPC Recruitment 2022 : सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात अनेकजण आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी सर्वांपासून चुकते. त्यामुळेच ‘वाचा मराठी’नं पुढाकार घेत, नोकरीची संधी आणि त्याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्यामुळं नोकरीची गरज असलेला तरुणवर्ग खालील ठिकाणी अर्ज करु शकतील.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) लिमिटेडमध्ये नोकरी (सरकारी नोकरी) शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. यासाठी NTPC ने अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी (EET) रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार NTPC च्या अधिकृत वेबसाइट ntpc.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ नोव्हेंबर आहे. याशिवाय, उमेदवार https://www.ntpc.co.in/ या लिंकद्वारे या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ८६४ पदे भरली जातील.
हेही वाचा – VIDEO : ३ फुटाची नवरी आणि ३ फुटाचा नवरा..! लग्नासाठी होता खूप उतावळा
NTPC भरतीसाठी महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची सुरुवात तारीख – २८ ऑक्टोबर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर
NTPC भरतीसाठी रिक्त जागा तपशील
एकूण पदांची संख्या – ८६४
NTPC भरतीसाठी पात्रता निकष
अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या संबंधित विषयांमध्ये उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी.
NTPC भरतीसाठी वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा २७ वर्षे असावी.
NTPC भरतीसाठी पगार
उमेदवारांना वेतन म्हणून ४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये (E1 ग्रेड) दिले जातील.
NTPC भरतीसाठी निवड प्रक्रिया
GATE २०२२ कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
NTPC Recruitment 2022 Notification PDF