Nobel Peace Prize 2022 : जेलमध्ये असलेल्या ‘त्या’ व्यक्तीला शांततेचा नोबेल पुरस्कार..!

WhatsApp Group

Nobel Peace Prize 2022 : या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार जेलमध्ये असलेले बेलारुसचे मानव अधिकार कार्यकर्ते अॅलेस बिल्यात्स्की, रशियन ग्रुप मेमोरियल आणि युक्रेनियन संस्था सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना जाहीर करण्यात आला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे प्रमुख बेरिट रिज अँडरसन यांनी शुक्रवारी ओस्लो येथे शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा केली. गेल्या वर्षी हा पुरस्कार रशियाच्या दिमित्री मुराटोव्ह आणि फिलीपिन्सच्या मारिया रेसा या दोन पत्रकारांना प्रदान करण्यात आला होता. तेव्हा भाषण स्वातंत्र्य, लोकशाही आणि शांततेची अत्यावश्यक गरज यांच्या रक्षणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

“ज्याने देशांत सैन्याची तैनाती कमी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट कार्य केले आहे” अशा व्यक्तीला शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जातो. या सन्मानाच्या घोषणेसह, नोबेल पारितोषिक समितीने आपल्या निवेदनात म्हटले, “शांतता पुरस्काराने सन्मानित व्यक्ती आणि संस्था आपापल्या देशातील नागरी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी युद्ध गुन्ह्यांचे आणि सत्तेच्या दुरुपयोगाचे दस्तऐवजीकरण उत्तम काम केले आहे.”

हेही वाचा – शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यात ‘ही’ गोष्ट करणार..! CM शिंदेंची ग्वाही

कोण आहेत अॅलेस बिल्यात्स्की?

६० वर्षीय अॅलेस बिल्यात्स्की एक प्रमुख बेलारशियन मानवाधिकार कार्यकर्ता आहेत, जे सध्या कोणत्याही सुनावणीशिवाय तुरुंगात आहेत. ते बेलारशियन सेंटर फॉर ह्यूमन राइट्सचे संस्थापक आहेत. बेलारशियन नेते अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी रस्त्यावरील निदर्शने क्रूरपणे दडपण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद म्हणून १९९६ मध्ये याची स्थापना करण्यात आली.

भारतातील तथ्य तपासक मोहम्मद झुबेर आणि प्रतीक सिन्हा पुरस्काराच्या शर्यतीत होते. पण या दोघांनाही नोबेल मिळाले नाही. स्वीडिश अकादमीने फ्रेंच लेखिका अ‍ॅनी एरनॉक्स यांना त्यांच्या लेखनासाठी या वर्षीचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर केला. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment