भारतात युरोपची मजा..! पिकनिक स्पॉटपेक्षाही भारी आहे ‘हा’ एक्सप्रेस वे, गडकरींनी शेअर केले फोटो!

WhatsApp Group

Ahmedabad-Vadodara Expressway : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याने संपूर्ण भारत प्रभावित झाला आहे. त्यांनी देशात द्रुतगती मार्ग आणि महामार्गांचे असे जाळे विणले आहे की मोठ्या शहरांमधील अंतर आता कमी झाले आहे. पण, गडकरी हे स्वत: 20 वर्षांपूर्वी बांधलेल्या एक्स्प्रेस वेचे चाहते आहेत आणि त्यांनी त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, हा रस्ता पिकनिक स्पॉटसारखा सुंदर दिसतो.

गडकरींनी 2003 आणि 2004 मध्ये सुरू झालेल्या अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेचे फोटो शेअर केले आहेत. याला महात्मा गांधी एक्स्प्रेस वे असेही म्हणतात. 93 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती मार्ग 4 लेनचा करण्यात आला आहे. या एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ 2.5 तासांवरून 1 तासावर आला आहे. 2004 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.

देशातील सर्वात व्यस्त रस्त्यांपैकी एक

अहमदाबाद-वडोदरा द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वात व्यस्त द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. त्यावरील वाढती वाहतूक पाहता आता याला 6 लेनचा विकास करण्यात येत आहे. IRB इन्फ्राने त्याच्या विस्तारासाठी निविदाही जिंकली आहे. लवकरच दोन्ही बाजूने आणखी एक लेन वाढविण्याचे काम सुरू होणार आहे. 6 लेन झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरळीत होईल.

हेही वाचा – CSK Vs RCB : सर्वात मोठा सामना..! कोणाला कितीने हरवायचं? किती ओव्हर्समध्ये? जाणून घ्या Playoffs Equation

काय म्हणाले गडकरी?

फोटो शेअर करताना नितीन गडकरी यांनी म्हटले, अहमदाबाद-वडोदरा एक्सप्रेसवे केवळ औद्योगिक शक्तीच दाखवत नाही तर नैसर्गिक सौंदर्यही पाहण्यासारखे आहे. या एक्स्प्रेसवेने दोन सर्वात व्यस्त शहरे तर जोडलीच आहेत, पण त्यावरून प्रवास करताना तुम्हाला अनेक नैसर्गिक सौंदर्यही पाहायला मिळते.

2009 पासून अपूर्ण प्रोजेक्ट

हा एक्स्प्रेस वे 20 वर्षांपासून सुरू असला तरी 2009 मध्ये त्यासाठी केलेला प्रोजेक्ट अद्याप अपूर्ण आहे. तेव्हा गुजरात सरकारने त्याला मोटारवे बांधण्याचा प्रकल्प दिला होता, तो मुंबईपर्यंत वाढवायचा होता. यासाठी IRB इन्फ्राला 3,300 कोटी रुपयांचे कंत्राटही देण्यात आले होते, तरीही प्रोजेक्टवर कोणतेही काम झालेले नाही. आता तो 6 लेनचा केला जात आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment