पुढच्या वर्षी म्हणजे मार्च 2024 पर्यंत महामार्गांवर मोठा बदल होणार आहे. मोदी सरकार जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणा आणणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, हायवे टोल प्लाझाची सध्याची व्यवस्था बदलण्यासाठी सरकार पुढील वर्षी मार्चपर्यंत जीपीएस-आधारित टोल-टॅक्स कलेक्शन सिस्टीमसह (GPS-Based Toll-Tax Collection System In Marathi) नवीन तंत्रज्ञान आणणार आहे.
गडकरी म्हणाले, “देशातील टोल प्लाझा व्यवस्थेचा कायापालट करण्यासाठी सरकार जीपीएस-आधारित टोल प्रणालीसह नवीन तंत्रज्ञान आणण्याचा विचार करत आहे. आम्ही पुढील वर्षी मार्चपर्यंत संपूर्ण देशभरात नवीन जीपीएस आधारित टोल वसुली सुरू करू. गाड्या न थांबवता ऑटोमॅटिक टोल कलेक्शन सक्षम करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळख प्रणालीचे दोन पायलट प्रकल्प सुरू केले आहेत.”
2018-19 या वर्षात टोलनाक्यांवर गाड्यांना सरासरी आठ मिनिटे थांबावे लागले. 2020-21 आणि 2021-22 मध्ये फास्टॅग प्रणाली लागू झाल्यानंतर ही वेळ फक्त 47 सेकंदांवर आली आहे. काही ठिकाणी, विशेषत: शहरांजवळील दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये, टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळेत लक्षणीय सुधारणा झाली आहे, तरीही गर्दीच्या वेळेस ही वेळ वाढते.
हेही वाचा – How To Become Rich : श्रीमंत, करोडपती, मालामाल व्हायचंय? ‘या’ 4 गोष्टी करा!
गडकरी म्हणाले की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकार 1,000 किमीपेक्षा कमी लांबीच्या महामार्ग प्रकल्पांसाठी ‘बिल्ड-ऑपरेट-हँडओव्हर’ (BOT) मॉडेलवर 1.5-2 लाख कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पावर बोली आमंत्रित करेल. एप्रिल-मे 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!