विमा प्रीमियमवरील GST मागे घेण्याच्या गडकरींच्या मागणीला ममतांचा ‘सपोर्ट’; तुमचे किती पैसे वाचतील? वाचा!

WhatsApp Group

GST on Insurance Premium : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून जीवन आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली होती. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विमा पॉलिसींवरील जीएसटी हटवण्याची मागणी करत गडकरींच्या मागणीला पाठिंबा दिला. ममता बॅनर्जी म्हणाल्या की याचा लोकांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात जीवन विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यांवर 18 टक्के दराने लागू होणारा जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे.

अनेक विरोधी नेत्यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. बॅनर्जी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील त्यांच्या एका पोस्टमध्ये या मागणीचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, ”आम्ही भारत सरकारकडे लोकांच्या आरोग्याच्या आवश्यक गोष्टी लक्षात घेऊन जीवन विमा आणि आरोग्य विम्यावर लागू होणारा जीएसटी हटवण्याची मागणी करतो. भारत सरकारने जनविरोधी जीएसटी मागे न घेतल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.”

हेही वाचा – ऑलिम्पिक मेडल जिंकून स्वप्नील कुसळे मालामाल, महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस!

गडकरींनी त्यांच्या सहकारी मंत्री निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात केलेल्या या मागणीला काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम, समाजवादी पक्षाचे राजीव कुमार राय आणि राष्ट्रीय जनता दलाचे खासदार ए.डी. सिंग यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. जीएसटीशी संबंधित बाबींवर निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था जीएसटी कौन्सिलची या महिन्यात बैठक होणार आहे. त्याची शेवटची बैठक जूनमध्ये झाली होती. आता यावर सरकार काही निर्णय घेते की नाही हे पाहायचे आहे.

किती फायदा होईल?

सरकारने नितीन गडकरी, ममता बॅनर्जी यांच्यासह सर्व नेत्यांची जीएसटी हटवण्याची मागणी मान्य केली, तर सर्वसामान्यांना त्यातून मोठा दिलासा मिळू शकतो. उदाहरणार्थ, तुमचा लाइफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम सध्या 30,000 रुपये प्रति वर्ष असल्यास, त्यातील एक मोठा भाग जीएसटी आहे. 30,000 रुपयांच्या पॉलिसी प्रीमियमपैकी 4,576 रुपये (18 टक्के) जीएसटी आहे, तर 25,424 रुपये पॉलिसी प्रीमियम आहे. पण जर सरकारने जीएसटी हटवला तर यानंतर तुम्हाला फक्त 25,424 रुपये भरावे लागतील.

व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment