माहीत करून घ्या भारतातील सर्वोत्तम 10 विद्यापीठे!

WhatsApp Group

NIRF Ranking 2023 : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात येणारी NIRF रँकिंग 2023 जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये देशातील सर्वोच्च संस्थांना विविध श्रेणींमध्ये मानांकन देण्यात आले आहे. जिथे एकूण क्रमवारीत IIT मद्रास ही देशातील सर्वोत्तम संस्था आहे. त्याच वेळी, IISc बंगळुरूला विद्यापीठांच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा दर्जा मिळाला आहे. चला जाणून घेऊया, देशातील टॉप-10 विद्यापीठे

टॉप-10 विद्यापीठे

NIRF रँकिंग 2023 नुसार, देशातील सर्वोच्च विद्यापीठ म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर जामिया मिलिया इस्लामिया आणि जादवपूर विद्यापीठ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. तर बनारस हिंदू विद्यापीठ पाचव्या क्रमांकावर आहे. मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनला 6 वे स्थान देण्यात आले आहे. सातव्या क्रमांकावर अमृता विश्व विद्यापीठ आहे.

हेही वाचा – Rinku Singh : आयपीएल गाजवलेला रिंकू सिंह सुट्टीवर कुठे गेलाय? फोटो व्हायरल!

NIRF रँकिंगमध्ये वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला 8 वे आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठ 9व्या स्थानावर आहे. आणि पहिल्या 10 यादीत 10 वा क्रमांक हैदराबाद विद्यापीठाला देण्यात आला आहे. शीर्ष 10 ची यादी खाली पहा-

  • आयआयएससी बंगळुरू
  • जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)
  • जामिया मिलिया इस्लामिया
  • जाधवपूर विद्यापीठ
  • बनारस हिंदू विद्यापीठ
  • मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन
  • अमृता विश्व विद्यापीठम्
  • वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
  • अलीगढ मुस्लिम विद्यापीठ
  • हैदराबाद विद्यापीठ

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment