मतमोजणीच्या दिवशी साडेबाराच्या आधीच एनडीए 400 चा टप्पा पार करेल – अमित शाह

WhatsApp Group

Amit Shah : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असूनही, गृहमंत्री अमित शाह यांनी नेटवर्क 18 चे ग्रुप एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. प्रत्येक प्रश्नाला त्यांनी मोकळेपणाने उत्तर दिले. एनडीएच्या लोकसभेच्या 400 जागा आणि भाजपच्या 370 जागा जिंकण्याच्या लक्ष्याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. भाजपचे दिग्गज नेते अमित शाह म्हणाले की, तुम्हाला मतमोजणीच्या दिवशी दिसेल, दुपारी साडेबारा वाजण्यापूर्वीच एनडीए 400 पार करेल.

अमित शाह यांना विचारण्यात आले, की पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचे प्रमाण थोडे कमी होते. काही राज्यांमध्ये ते 5 ते 6 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तुमचा नारा एनडीएला 400 जागा आणि भाजपला 370 जागा पार करण्याचा आहे, मग गाडी रुळावर आहे का? याला उत्तर देताना शाह म्हणाले, ”पूर्णपणे ट्रॅकवर आहे. निकालाच्या दिवशी दिसेल. साडे बारापूर्वी एनडीए 400 चा टप्पा पार करेल. मोदीजी पुन्हा पंतप्रधान होतील. कमी मतदानाची अनेक कारणे आहेत. तब्बल 12 वर्षांनंतर मतदार यादी अद्ययावत करण्यात आली आहे. दुसरे कारण म्हणजे आघाडीकडून लढत नाही, त्यामुळे एकप्रकारे मतदानावर परिणाम होत आहे. पण आमच्या पक्षाच्या टीमने आणि मी स्वत: खूप तपशीलवार विश्लेषण केले आहे. दोन टप्प्यात 100 पेक्षा जास्त जागा जिंकून आम्ही पुढे जात आहोत. अशा परिस्थितीत मला 400 चे लक्ष्य पार करण्यात कोणतीही अडचण दिसत नाही.”

दहशतवाद आणि नक्षलवादावर नियंत्रण

शाह म्हणाले, या देशातील सर्व प्रथम दहशतवाद आणि नक्षलवाद या दोन अशा समस्या आहेत ज्या अनेक दशकांपासून देशाच्या विकासासाठी बाधा बनल्या आहेत. 10 वर्षात नरेंद्र मोदींनी जवळपास 100 टक्के दहशतवादापासून मुक्ती मिळवली आहे आणि नक्षलवादाचा 95 टक्क्यांपर्यंत नायनाट झाला आहे असे म्हणता येईल.

हेही वाचा – IPL 2024 CSK Vs PBKS : पंजाब किंग्जचा सीएसकेला धक्का! 7 विकेट्सने चारली धूळ

शाह पुढे म्हणाले, ”आज बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 7 राज्यांमधून नक्षलवादाचा पूर्णपणे नायनाट झाला आहे. छत्तीसगडमधील 4 जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी उरले आहेत. आता तेथेही भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले असून गेल्या 3 महिन्यांत जवळपास 100 नक्षलवादी मारले गेले आहेत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर एक-दोन वर्षांत देशाला नक्षलवादापासून मुक्ती मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment