कॅन्सरशी झुंजतेय पत्नी, नवज्योत सिंग सिद्धूंची इमोशनल पोस्ट! म्हणाले….

WhatsApp Group

Navjot Singh Siddhu : रोड रेज प्रकरणी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू सध्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर कॅन्सरशी लढत आहेत. सिद्धू आपल्या पत्नीसोबत सावलीसारखे राहत असून, त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी स्वतःच्या हाताने आपल्या पत्नीला जेवण भरवले. 19 मे 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना तीन दशक जुन्या रोड रेज प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावली होती.

शिक्षा पूर्ण होणार होती, पण सिद्धू यांना हा आनंद अनुभवणे फार कठीण झाले. ते एप्रिलमध्ये तुरुंगात असताना, त्यांच्या पत्नीला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले. निदान झाल्यावर, त्यांची रॅडिकल मॅस्टेक्टोमी झाली आणि कर्करोग पूर्णपणे काढून टाकला गेला. तुरुंगातून बाहेर आल्यापासून सिद्धू आपल्या जोडीदारासोबत सावलीसारखे राहत आहेत.

हेही वाचा – VIDEO : जपानी कपल भारतात आलंय, फक्त रजनीकांतचा सिनेमा पाहायला!

आत्तापर्यंत डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांच्या पाच केमोथेरपी झाल्या आहेत. दरम्यान, सिद्धू यांनी त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून भावनिक पोस्टसह फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सिद्धू आपल्या पत्नीला स्वत:च्या हाताने भरवताना दिसत आहेत.

सिद्धू तुरुंगात असताना कॅन्सरच्या शस्त्रक्रियेपूर्वी नवज्योत कौर यांनीही एक भावनिक पोस्ट केली होती. सिद्धू यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी देवाकडे मृत्यू मागितल्याचे त्यांनी लिहिले होते. ”तुमची वाट पाहिली, तुला पुन्हा पुन्हा न्याय नाकारला गेला, पण सत्य इतके शक्तिशाली आहे की ते पुन्हा पुन्हा तुझी परीक्षा घेते. मला माफ करा, तुमची वाट पाहू शकत नाही. कर्करोगाचा हा दुसरा प्राणघातक टप्पा आहे”, असे त्यांनी म्हटले होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment