भयानक..! नासानं शेअर केला ब्लॅक होलमधून येणारा आवाज; तुम्ही ऐकला का?

WhatsApp Group

sound coming from a black hole : आपलं अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेलं आहे. असं असलं तरी ते पूर्णपणे रिकामे आहे. रिकाम्या जागेमुळं तिथं आवाज येत नाही. रिकाम्या जागेत ध्वनी लहरी प्रवास करू शकत नाहीत. मात्र, अनेक ठिकाणी अवकाशात वायू असतात, त्यामुळं ध्वनी लहरी प्रवास करू शकतात. नासानं आता अलीकडेच पर्सियस आकाशगंगा क्लस्टरच्या मध्यभागी एका मोठ्या कृष्णविवराचा आवाज शोधला आहे. कृष्णविवर म्हणजेच ‘ब्लॅक होल’चं रहस्य जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ रोज नवनवीन संशोधन करत आहेत. आता नासानं ब्लॅक होलचा आवाज शेअर केला आहे. २५० मिलियन प्रकाशवर्षे दूर असलेल्या या ब्लॅक होलमध्ये वायू आणि प्लाझ्मामधून फिरणाऱ्या खऱ्या ध्वनी लहरींचा शोध लागला आहे. आकाशगंगेमध्ये असे अनेक प्रकारचे वायू आहेत, ज्यांच्या घर्षणानं आवाज निर्माण होतो. ब्लॅक होलभोवती असलेल्या वायूंनी नासाच्या शास्त्रज्ञांना त्याचा आवाज रेकॉर्ड करण्यास मदत केली. तुम्ही ऐकत असलेल्या ब्लॅक होलचा आवाज त्याच्या मूळ वारंवारतेपेक्षा १४४० लाख कोटी ते २८८० लाख कोटी पटीनं अधिक फ्रिक्वेंसीनं ऐकत आहात.

ब्लॅक होलमधून येणारा आवाज

ब्लॅक होलचा आवाज शेअर करताना नासानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, ”अंतराळात आवाज नसतो हा गैरसमज आहे, कारण आकाशगंगा रिकामी आहे, ध्वनी लहरींना प्रवास करण्यासाठी कोणताही मार्ग देत नाही. गॅलेक्सी क्लस्टरमध्ये इतका वायू आहे की आपण वास्तविक आवाज कॅप्चर केला आहे. इथं प्रवर्धित आणि इतर डेटासह मिश्रित ब्लॅक होलचा आवाज आहे.”

हेही वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खान जाणार देशाबाहेर!

काय आहे ब्लॅक होल?

ब्लॅक होल म्हणजे अवकाशातील एक अशी जागा जिथं भौतिकशास्त्राचा कोणताही नियम काम करत नाही. इथं पदार्थ आपोआप संपतात. त्यातून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. ब्लॅक होलच्या ऊर्जेबद्दल असं म्हटलं जातं, की तो इतका मोठा आहे, की त्याच्या आत सर्वात मोठे ग्रह देखील बसू शकतात. ब्लॅक होल कसे तयार होतात हे अद्याप माहीत नाही. इथं पोहोचल्यावर काय होईल, हे कोणालाच माहीत नाही. तुम्ही सर्व काही विसरून नव्या जगात पोहोचाल की तुमचे आयुष्य संपेल, हे रहस्य आजतागायत कायम आहे.

एका सिद्धांतानुसार, जेव्हा एखादा मोठा तारा त्याची ऊर्जा पूर्णपणे नष्ट करतो, या दरम्यान ग्रह स्वतःवर कोसळतो आणि अत्यंत उच्च गुरुत्वाकर्षण शक्तीसह एक उच्च-घनता रचना तयार करतो, ज्याला आपण ब्लॅक होल म्हणून ओळखतो. जेव्हा एखादा प्रचंड तारा त्याच्या शेवटाकडं पोहोचतो तेव्हा तो स्वतःच आकुंचन पावू लागतो. हळूहळू तो ब्लॅक होल बनतो.

हेही वाचा – दोन लिंबू आणि कोळसा खाऊन ‘तो’ त्या बेटावर ५ दिवस जिवंत राहिला!

नासानं शेअर केलेल्या ब्लॅक होलच्या आवाजात लोकांनी ओम ऐकला आहे. अनेकांनी नासाचा व्हिडिओ रिट्वीट करून ओमचा आवाज अंतराळात गुंजत असल्याचं लिहिलं. २००३ मध्ये, ब्लॅक होल प्रथम ध्वनीशी जोडला गेला आणि केस स्टडी म्हणून वापरला गेला. मग शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की ब्लॅक होलमुळे निर्माण झालेल्या दाबामुळं क्लस्टरच्या गरम वायूमध्ये तरंग निर्माण होतात. मात्र, हा आवाज इतका कमी होता की माणसांना तो ऐकू येत नव्हता. शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्रीय डेटाचं सोनिफिकेशन करून यात बदल केले, जेणेकरून ब्लॅक होलचा आवाज माणसांना ऐकू येईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment