NASA : अंतराळात 371 दिवस घालवल्यानंतर अमेरिकन अंतराळवीर फ्रँक रुबिओ पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना कझाकस्तानच्या दुर्गम भागात सोयुझ कॅप्सूलमध्ये उतरवण्यात आले. त्याच्यासोबत रशियन अंतराळवीर सर्गेई प्रोकोपिएव्ह आणि दिमित्री पेटलिन हे देखील अवकाशातून परतले आहेत.
रुबिओ हे अंतराळात सर्वाधिक काळ सेवा करणारे अमेरिकन अंतराळवीर ठरले आहेत. त्यांनी हा विक्रम 11 सप्टेंबर रोजी केला होता. ते 371 दिवस अंतराळात राहिले. याआधी अमेरिकन अंतराळवीर मार्क वांडे हे यांनी 2022 मध्ये 355 दिवसांचा विक्रम केला होता. मात्र, आतापर्यंत अंतराळात सर्वाधिक वेळ घालवण्याचा विक्रम रशियन अंतराळवीर व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांच्या नावावर आहे, ज्यांनी 437 दिवस घालवले.
अवकाशयानाची टक्कर
फ्रँक रुबिओ यांना 180 दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर पाठवण्यात आले होते, परंतु त्यांचे अंतराळ यान एका जंकला धडकले. त्यामुळे अंतराळयानाची कुलिंग सिस्टीम खराब झाली. या कारणामुळे अमेरिकन अंतराळवीराला बराच काळ थांबावे लागले. या संपूर्ण प्रकरणावर रुबिओ सांगतात की, जर त्याला माहीत असते की, आपल्याला 1 वर्ष अंतराळात राहावे लागेल, तर ते कधीही मोहिमेवर गेले नसते.
रुबिओ यांची 5 हजाराहून अधिक वेळा पृथ्वी प्रदक्षिणा
अमेरिकेच्या फ्रँक रुबिओल यांनी अवकाश स्थानकात असताना पृथ्वीभोवती 5963 प्रदक्षिणा केल्या. दरम्यान त्यांनी 15 कोटी 74 लाख 12 हजार 306 मैलांचा प्रवास केला. त्याची तुलना चंद्राच्या प्रवासाशी केली, तर या अंतरावर चंद्रावर जाता येते आणि किमान 328 वेळा परत जाता येते.
हेही वाचा – Asian Games 2023 : पुण्याच्या मराठी पोरीनं रचला इतिहास, 42 वर्षाच्या बोपण्णाची लाभली साथ!
फ्रँक रुबिओ हे अंतराळात सर्वाधिक काळ राहून अमेरिकेचे अंतराळवीर बनले आहेत, परंतु एकूणच ते तिसरे आहेत. रशियन अंतराळवीर व्हॅलेरी पॉलीकोव्ह पहिल्या क्रमांकावर आहे. तो 437 दिवस अंतराळात राहिला. त्याने पृथ्वीला 7 हजार वेळा प्रदक्षिणा घातली होती. शियन अंतराळवीर सर्गेई प्रोकोपिएव्ह आणि दिमित्री पेटेलिन हे देखील एका वर्षाहून अधिक काळ अंतराळात घालवणारे सहावे आणि सातवे अंतराळवीर ठरले आहेत. यापूर्वी, सोव्हिएत युनियनच्या काळात, रशियन अंतराळवीर सर्गेई अवदेव, मुसा मॅनारोव, व्लादिमीर टिटोव्ह आणि व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांनी अंतराळात 365 दिवस घालवले होते.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!