जावई बनलाय ब्रिटनचा पंतप्रधान..! नारायण मूर्ती म्हणाले, “अभिनंदन ऋषी, आम्हाला…”

WhatsApp Group

Narayana Murthy On Rishi Sunak : भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती ठरले आहेत, जे ब्रिटन सरकारच्या सर्वोच्च पदावर असतील. ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यापासून ब्रिटनपासून भारतापर्यंत जल्लोषाचे वातावरण आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि ऋषी सुनक यांचे सासरे एनआर नारायण मूर्ती यांनी सुनक यांच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर प्रथमच विधान केले आहे.

ऋषी सुनक यांनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत लग्न केले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट झाली. पुढे दोघांनी लग्न केले. ऋषी आणि अक्षता यांना दोन मुलीही आहेत, ज्यांची नावे कृष्णा आणि अनुष्का आहेत.

हेही वाचा – IND Vs PAK : कसं होणार या पाकड्यांचं? मैदानात केलेली चूक भारतीयांनी ओळखली; पाहा Video

”आम्हाला त्याचा अभिमान”

नारायण मूर्ती म्हणाले, ”अभिनंदन ऋषी. आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि त्यांच्या यशासाठी शुभेच्छा. युनायटेड किंगडममधील लोकांसाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करेल असा आम्हाला विश्वास आहे.” ऋषी सुनक हे ब्रिटनचे असे नेते आहेत, ज्यांना श्रीमंत सासरच्या मंडळींमुळेही लक्ष्य केले जाते. या वर्षी एप्रिलमध्ये शेअर बाजारांतील आकडेवारीमधून समोर मीडिया रिपोर्टनुसार, अक्षता मूर्तींची संपत्ती ब्रिटनच्या राणी एलिझाबेथच्या संपत्तीपेक्षा जास्त होती.

नारायण मूर्ती यांची इन्फोसिस ही भारतातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. सध्या यूकेसह सुमारे ५० देशांमध्ये त्यांचे व्यावसायिक नेटवर्क आहे. जर आपण कंपनीच्या कमाईवर नजर टाकली तर ती २०१९ मध्ये ११.८ बिलियन डॉलर्स, 2020 मध्ये १२.८ बिलियन डॉलर्स आणि २०२१ मध्ये १३.५ बिलियन डॉलर्स होती.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment