VIDEO : “तू का करत नाहीस…?” नाना पाटेकरांचा राजदीप सरदेसाईंना टोला; काय बोलावं ते कळेना!

WhatsApp Group

Nana Patekar Rajdeep Sardesai Video : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मुलाखत देण्यासाठी सौरभ द्विवेदींच्या ‘द लॅलनटॉप’ शो ‘गेस्ट इन द न्यूजरूम’मध्ये पोहोचले. नाना पाटेकर जवळपास 4 तास तिथे थांबले. त्याचा व्हिडिओ रविवारी (23 जून 2024) ‘द लॅलनटॉप’च्या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित झाला. नाना पाटेकर यांनी या व्हिडिओमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा केली, परंतु सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांनी राजदीप सरदेसाई यांना टोला लगावला. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या राजदीप सरदेसाई यांनी माईक हातात घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

‘इंडिया टुडे’मध्ये सल्लागार संपादक म्हणून कार्यरत असलेले राजदीप सरदेसाई न्यूजरूममध्ये पोहोचल्यानंतर काही काळ मराठीत संवाद साधला आणि नंतर सौरभ द्विवेदी यांचे वर्णन ‘हिंदी भाषिक जगातून’ असे केले. यावर नाना पाटेकर म्हणाले की, तामिळ असो, उर्दू, कन्नड, पंजाबी किंवा हिंदी – ज्या दिवशी आपण ठरवू की ते एक आहे, तेव्हा सर्वकाही सोपे होईल. गिरीजा ओक हिच्या सांगण्यावरून मी इथे आलो आहे, गिरीजाने सौरभ द्विवेदी हा मित्र असल्याचे सांगितले होते, असे नाना पाटेकर म्हणाले.

हेही वाचा – न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर विराट कोहलीचा पुतळा, प्रत्येकजण शेअर करतोय व्हिडिओ

राजदीप सरदेसाई म्हणाले की, सौरभ द्विवेदी हे संपादक म्हणून तात्पुरते आहेत, अनुराग कश्यपसारखा चित्रपट निर्माता-दिग्दर्शक बनण्याचे त्यांचे स्वप्न आहे. यानंतर नाना पाटेकर यांनी सौरभ द्विवेदी यांच्या बोलण्याच्या शैलीचे आणि त्यांच्या भाषणाचे कौतुक केले. यावर राजदीप सरदेसाई म्हणाले, “सौरभ द्विवेदीचं हिंदी खूप चांगलं आहे, त्यांची संपूर्ण टीम खूप चांगली आहे. मी इथे आलो आहे कारण आजकाल बातम्यांच्या जगात एवढा गोंगाट आहे की मला इथे शांतता वाटते. मला हे आवडतं.”

राजदीप सरदेसाई म्हणाले की, ”द ललनटॉप’ने खरेच पत्रकारितेचे नियम पाळले आहेत, त्यावर नाना पाटेकर यांनी विचारले की तू ते का पाळत नाही? यावर राजदीप सरदेसाई यांनी ‘आहाहाहा-ओहोहोहो’ म्हणण्यास सुरुवात केली आणि आपण प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तुम्हाला वाईटाऐवजी चांगलं का दिसत नाही, तुम्ही स्वतःची काळजी का घेत नाही असा सवाल नाना पाटेकरांनी केला. यावेळी त्यांनी राजदीप यांचे वडील दिलीप सरदेसाई यांच्या फलंदाजीचेही कौतुक केले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment