The Dress : या ड्रेसचा रंग कोणता? व्हाईट-गोल्ड की ब्लू-ब्लॅक? तुम्हाला काय वाटतं?

WhatsApp Group

Mystery Behind The Dress : काही वर्षांपूर्वी या एका ड्रेसच्या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता. एक ड्रेस पण त्याचा रंग व्हाईट-गोल्ड की ब्लू-ब्लॅक यावरून गोंधळ निर्माण झाला. अनेकांना या ड्रेसचा रंग व्हाईट-गोल्ड वाटला, तर अनेकांना हा ड्रेस ब्लू-ब्लॅक रंगाचा वाटला. अखेर अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी 2015 मध्ये इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या ड्रेसच्या फोटोचे रहस्य उलगडले आहे

उल्लेखनीय म्हणजे, फेब्रुवारी 2015 मध्ये, कॅटलिन मॅकनील नावाच्या 21 वर्षीय गायिकेने तिच्या ब्लॉगवर एक ड्रेस पोस्ट केला होता. कॅटलिनचे असे म्हणणे होते, की हा ड्रेस ब्लू-ब्लॅक रंगाचा आहे, परंतु बऱ्याच लोकांना हा ड्रेस व्हाईट-गोल्ड रंगाचा वाटत होता. यानंतर या ड्रेसचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला. त्याच्या रंगांवरून निर्माण झालेल्या वादादरम्यान, त्या काळात शास्त्रज्ञांनी सांगितले होते की जे लोक नैसर्गिक प्रकाशात जास्त राहतात, त्यांना हा ड्रेस व्हाईट-गोल्ड रंगाचा दिसतो, नैसर्गिक किंवा कृत्रिम प्रकाशात जास्त राहतात त्यांना हा ड्रेस ब्लू-ब्लॅक रंगाचा दिसतो.

Mystery behind the dress colour black and blue or white and gold

हेही वाचा – EPFO : ७ कोटी लोकांसाठी खुशखबर..! सरकारने वाढवले PF वरील व्याज; आता मिळणार ‘इतके’!

या संशोधनाशी संबंधित न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीचे पास्कल वॅलिश म्हणाले, ”जेव्हा आपण पाहतो की ड्रेसचा फोटो सावलीत काढला आहे आणि सावली निळी आहे तेव्हा आपण ड्रेस पाहून असा अंदाज लावतो की गडद सावलीने हलक्या रंगाच्या ड्रेसची चमक विचलित केली आहे. अशा परिस्थितीत हा ड्रेस आपल्याला सोनेरी आणि पांढरा दिसतो. तर, कृत्रिम प्रकाश पिवळा भ्रम देतो. मग त्याचा फोटो कृत्रिम प्रकाशात काढला आहे असे आपल्याला वाटले तर तो आपल्याला काळा आणि निळा दिसतो. वलिश पुढे म्हणतात की हे एक संज्ञानात्मक कार्य आहे. ज्यामध्ये एखाद्या वस्तूचा रंग ठरवताना त्याच्या प्रकाशाच्या स्रोतावर लक्ष केंद्रित केले जाते आणि आपला मेंदू हे काम सतत करत राहतो.”

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment