Mumbai-Goa Vande Bharat Express : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गोव्यातील पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ हिरवा झेंडा दाखवतील. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई येथे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे स्वागत करतील. मोदी 3 जून रोजी गोव्यातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस समोर आणणार होते, परंतु ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला. ही देशातील 19वी वंदे भारत ट्रेन असेल.
प्रधानमंत्री मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीकोनातून, अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे मुंबई-गोवा मार्गावरील दळणवळण सुधारेल आणि या भागातील लोकांना वेगवान आणि सुखकर प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होईल. ही रेल्वे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव स्थानकादरम्यान धावणार आहे. या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या सध्याच्या वेगवान रेल्वे गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत रेल्वे गाडी हा प्रवास सुमारे साडेसात तासांत पूर्ण करेल, यामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे एका तासांची बचत होईल. स्वदेशी बनावटीची, जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आणि कवच तंत्रज्ञानासह अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह असलेली ही रेल्वे दोन्ही राज्यांमध्ये पर्यटनाला चालना देईल.
उद्घाटन सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस नियमित धावणार आहे. ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ५.२५ वाजता सुटेल, तर मडगाव येथे दुपारी १.१० वाजता पोहोचेल. त्यानंतर मडगाव येथून दुपारी २.४० वाजता सुटेल, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे रात्री १०.३० वाजता पोहोचेल.
Goa Vande Bharat
Mumbai to Goa #VandeBharat will leave CSMT at 5.25 am, Dadar at 5.32 am via Ratnagiri at 9.45 am & Kankavali 11.20 am reach Madgaon at 1.15 pm.
Goa to Mumbai Vande Bharat will leave Madgaon at 2.35 pm, Kankavali 4.18 pm Ratnagiri 5.45 pm &reach CSMT at 10.25 am pic.twitter.com/3ubQEVvbML
— Michael (@PRforRAIL) June 1, 2023
हेही वाचा – ऋतुराजचे लग्न, सायली संजीवने शेअर केला फोटो! म्हणाली, “तुमच्यासाठी खूपच….”
चेन्नईस्थित इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीमध्ये सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती झाली आहे. देशभरात सध्या ७५ वंदे भारत सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर मुंबईतून गांधीनगर (गुजरात), शिर्डी आणि सोलापूरदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. या एक्स्प्रेसमुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. वंदेभारत एक्स्प्रेसची गेल्या महिन्यात कोकण रेल्वेच्या मार्गावर यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर मडगावहून निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस स्वागत करतील, तसेच प्रवाशांशी संवाद साधतील.
Vande Bharat express stops at Kankavali on its way from Mumbai to Goa !
Special thanks to Hon Railway Minister @AshwiniVaishnaw ji n Hon Min @MeNarayanRane ji for accepting our request ! @BJP4Maharashtra pic.twitter.com/xLj3tqgVKh— nitesh rane (@NiteshNRane) May 31, 2023
मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे थांबे
मडगाव, थिवीम, कणकवली, रत्नागिरी, खेड, पनवेल, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई).
तिकीट किती?
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची मानक किंमत कव्हर केलेल्या अंतरावर अवलंबून असते. एसी चेअर कारची किंमत 1,100 ते 1,600 रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लास श्रेणीसाठी ती 2,000 ते 2,800 रुपयांदरम्यान असू शकते.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!